1 जुलैपासून बदलणार महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

जून महिन्याचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे. जुलै महिना(rullet) सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. पुढील महिन्यात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे नियम आत्ताच जाणून घ्या, अन्यथा तुमच्या खिशाला कात्री लागू शकते.

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी(rullet) सिलेंडरची किंमत अपडेट केली जाते. याशिवाय सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्येही बदल करण्यात येत असतात.

1 जुलैपासून ‘या’ नियमांमध्ये बदल होणार
एलपीजी सिलेंडरची किंमत
: एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी अपडेट केल्या जातात. 1 मे रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात केली. आता 1 जुलै रोजी सिलेंडरची किंमत कमी होणार की पुन्हा वाढणार हे पाहावं लागेल.

इंडियन बँक स्पेशल एफडी : इंडियन बँक आपल्या ग्राहकांसाठी विशेष एफडी चालवत आहे. या एफडीचा कालावधी 300 आणि 400 दिवसांचा आहे. इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या एफडीचे नाव इंड सुपर 400 आणि इंड सुप्रीम 300 दिवस आहे.

या FD मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. ही एक कॉलेबल करण्यायोग्य FD आहे, अर्थातच तुम्ही जेव्हा हवे तेव्हा त्यातून पैसे काढू शकता. या FD मध्ये सर्वसामान्यांना 7.25 %, ज्येष्ठ नागरिक 7.75% आणि अति ज्येष्ठ नागरिक 8% व्याज मिळते.

क्रेडिट कार्ड : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने क्रेडिट कार्ड बिल पेमेंटबाबत नवीन नियम जारी केले आहेत. हा नियम 1 जुलै 2024 पासून लागू होईल.या बदलाचा थेट परिणाम PhonePay, Cred, BillDesk आणि Infibeam Avenues सारख्या फिनटेक प्लॅटफॉर्मवर होईल. RBI ने सर्व बँकांना निर्देश दिले आहेत की 1 जुलै 2024 पासून सर्व क्रेडिट कार्ड पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टम द्वारे केले जावे.

पंजाब आणि सिंध बँक एफडी : पंजाब अँड सिंध बँक स्पेशल एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. या एफडीचा कालावधी 222 दिवस, 333 दिवस आणि 444 दिवसांचा आहे. या FD वर कमाल .05 टक्के व्याज मिळते.

हेही वाचा :

ब्रेकिंग! चंद्रकांत पाटील यांनी मोठ्ठी कॅडबरी देत घेतली उद्धव ठाकरेंची भेट

विवाहबाह्य संबध ठेवल्याचा आरोप लावत महिलेला जमावाची काठीने मारहाण 

कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यूचा कहर; ३०० हून अधिक ग्रामस्थांना लागण