इचलकरंजी विधानसभा निवडणुकीवर महायुतीत तगड्या उमेदवारांची चुरस

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत राजकीय वातावरण(grand) चांगलंच तापलं आहे. महायुतीत उमेदवारीसाठी तगड्या उमेदवारांची चुरस निर्माण झाली आहे, तर महाविकास आघाडी आपल्या रणनीतीवर विचारमंथन करत आहे.

इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासून पहिल्यांदाच(grand) विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. या मतदारसंघात आयुक्त बदलण्यावरून महायुतीतील नेत्यांमध्ये चांगलीच जुंप झाल्याचं दिसतंय. महायुतीत उमेदवारीसाठी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने या तगड्या उमेदवारांमध्ये चुरस आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर आमदार आवाडे यांनी सहकार्याची भूमिका घेतली असून, त्यांच्या नाराजीची भूमिका आगामी निवडणुकीच्या अनुषंगानेच असल्याचं बोललं जातंय. तर शिंदे गटाच्या जयसिंगपूर मेळाव्यात कार्यकर्त्यांनी रवींद्र माने यांना इचलकरंजीतून लढण्याचं आवाहन केलं आहे.

महाविकास आघाडीत देखील उमेदवारीसाठी हालचाली सुरू आहेत. आमदार आवाडे यांच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली महाविकास आघाडीकडून होत आहेत. मदन कारंडे आणि राहुल खंजिरे हे संभाव्य उमेदवार असू शकतात, पण अपेक्षित यश मिळेल की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून स्वतंत्र उमेदवारीची घोषणा होऊ शकते. तसेच, वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र आल्यास महाविकास आघाडीलाच फटका बसण्याची शक्यता आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून उमेदवारी कोणाला द्यावी यावर डोकेदुखी वाढली आहे, तर महाविकास आघाडीला तगड्या उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्रासाठी पुढील काही तास धोक्याचे; ‘या’ भागात दरडी कोसळण्याची शक्यता

दुसऱ्याच सामन्यात शुभमनचा मोठा निर्णय; कर्णधारपदावर होतायत प्रश्न उपस्थित!

“अरमान मलिकची बिग बॉसमधून हकालपट्टी करा”, विशाल पांडेचे आई-वडील संतापले