ठाकरे गटात Incoming सुरू ; ‘या’ माजी आमदाराची लवकरच घरवापसी ?

ठाकरे गटात नव्या इनकमिंगची सुरुवात झाली आहे, आणि एका माजी आमदाराच्या(political news today) लवकरच घरवापसीची शक्यता आहे. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे आणि आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटाची ताकद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


शिवसेनेचे गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रमेश कुथे लवकरच घरवापसी करणार आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी मातोश्रीला भेट देऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे ठाकरे गटात आवक वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कुथे शिवसेना-भाजप(political news today) युती असताना 1995 आणि 1999 असे दोन वेळा गोंदिया Gondia विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर काँग्रेसचे गोपाल अग्रवाल यांनी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. तेसुद्धा दोन वेळा निवडून आले. भाजपने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतल्यानंतर कुथे यांनी भाजपात प्रवेश केला होता. तेव्हापासून ते उपेक्षितच होते.

भाजपमध्ये असलेल्या इच्छुकांच्या भाऊगर्दी त्यांना निवडणूक लढण्याची संधीच मिळाली नाही. त्यातच 2014 च्या निवडणुकीत गोपाल अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी भाजपात मोठे बंड झाले होते. भाजपचे विनोद अग्रवाल यांनी बंडखोरी केली. ते निवडूणसुद्धा आले आहेत. सध्या ते भाजपसोबतच आहेत. हे बघता कुथे यांना संधी मिळण्याची शक्यता नाही.

भाजपात झालेली कोंडी आणि अस्वस्थ असलेल्या कुथे Ramesh Kuthe यांची मध्यंतरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पटोले यांनी त्यांच्या घरी भेट दिली होती. त्यावरून ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावरून ते काँग्रेसमध्ये जाणार असा अंदाज बांधला जात होता. आता त्यांना ‘मातोश्री’वरून बोलावणे आले आहे.

गोंदिया-भंडाराचे माजी जिल्हा प्रमुख आणि पूर्व विदर्भाचे सह संघटनमंत्री सतीश हरडे यांनी मातोश्रीचा निरोप त्यांना दिला. त्यानुसार त्यांनी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. कुथे यांनी अद्याप निर्णय जाहीर केला नसला तरी ‘मातोश्री’वरच्या भेटीगाठीवरून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेत परत जातील असे बोलले जात आहे. गोंदिया विधानसभा ठाकरे गटाला जाणार असल्याची यानिमित्ताने जिल्ह्यात सुरू झाली आहे.

हेही वाचा :

माजी आमदाराला अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

भाजपच्या महिला नेत्याला नग्न करून मारहाण? नव्या वादाला सुरुवात

मोठी बातमी! HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना बसणार मोठा फटका