देशात श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी १६ जणांचा मृत्यू

Shri Ganesha

अनंतचतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती(Shri Ganesh) विसर्जन करतांना देशातील काही राज्यांत गणेशभक्तांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. उत्तरप्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांत विसर्जनाच्या वेळी १६ जणांचा मृत्यू झाला.

युवकों की डूबने से मौत (प्रतिकात्मक तस्वीर)

 

हरियाणातील महेंद्रगड आणि सोनीपत येथे विसर्जनासाठी गेलेल्या ६ तरुणांचा बुडून मृत्यू झाला. याच घटनेच्या वेळी पाण्याच्या जोरदार प्रवाहात ९ जण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. यांतील तिघांना वाचवण्यात आले. उत्तरप्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी ४ भावंडांसह ६ जणांचा बुडून मृत्यू झाला. महाराष्ट्रातील धुळ्यामध्ये एकाचा मृत्यू झाला(Shri Ganesh).

Smart News-