दर महिन्याला पगार आपल्या खात्यात येतो. त्यामुळे (salary)महिन्याभराचा खर्च भागवता येतो. परंतु सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला आपल्या खात्यात पगार येणार नाही. त्यामुळे आपण आधीच बचत करायला हवी. वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करायला हवी. जेव्हा योजनांमध्ये गुंतवणूक करतात तेव्हा तुम्हाला चांगले व्याजदरदेखील मिळते. तुम्ही भविष्यात आर्थिक अडचण दूर करण्यासाठी आताच अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करा.

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन मिळवू शकतात.ही सरकारी योजना आहे. या योजनेत तुम्हाला गॅरंटीड पेन्शन मिळते. या योजनेत दिवसाला ७ रुपये वाचवून तुम्ही ५००० रुपयांची पेन्शन मिळवू शकतात.१८ ते ४० वयोगटातील नागरिक या योजनेत (salary)गुंतवणूक करु शकतात. या योजनेत पेन्शनवर सरकार स्वतः गॅरंटी देते.या योजनेत कमीत कमी २० वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे. त्यासाठी जर तुम्ही १८ व्या वर्षी गुंतवणूक केली तर ५००० रुपये पेन्शन मिळवू शकतात. या योजनेत महिन्याला २१० रुपये जमा करायचे आहेत. म्हणजेच जेव्हा दिवसाला ७ रुपये गुंतवणार तेव्हा ५००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे.
जर तुम्ही महिन्याला ४२ रुपये गुंतवले तर १००० रुपयांची पेन्शन तुम्हाला मिळणार आहे. पती आणि पत्नी दोघांच्या नावावर तुम्ही १० हजार रुपयांची पेन्शन मिळवू शकतात.(salary) या योजनेत ७ कोटींपेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत. या योजनेत तुम्हाला १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर टॅक्स बेनिफिट मिळणार आहे. तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत १.५ लाखांवर टॅक्स भरण्याची गरज नाही. या योजनेत तुम्ही तुम्हाला जेवढी पेन्शन हवी आहे त्या हिशोबाने गुंतवणूक करु शकतात.
हेही वाचा :
51 वर्षांची मलायका अरोराच्या लूकनं नाही तर पोटावर सगळ्यांच्या नजरा
सिनेस्टाईल अपहरण प्रकरणी मोठी अपडेट नवऱ्याने बायकोसोबत भयकंर कृत्य का केलं
सासऱ्याला सूनेच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजलं त्यानंतर दोघांमध्ये शेतात जे घडलं