सारे जग आता पुन्हा धोक्याच्या उंबरठ्यावर?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : संपूर्ण जगाला(world) संकटात ढकलणारा देश म्हणून चीन ओळखला जाऊ लागला आहे. महाकाय धरणे बांधून पृथ्वीचा दबाव वाढवणारा, तिच्यावर अतिरिक्त बोजा टाकणारा, विविध प्रकारची संशोधने करताना प्रयोगशाळेत पुरेशी खबरदारी न घेणारा, वसाहतवादी प्रवृत्ती असणारा, आसपासच्या राष्ट्रात अस्थिरता निर्माण करणारा, अशा अनेक ओळखी निर्माण करणारा चीन आता विषारी विषाणूंचा वाहक बनला आहे. प्रसारक झाला आहे. एच एम पी व्ही या नव्या विषाणूमुळे साऱ्या जगाला आता पुन्हा एकदा म्हणजे कोविड नंतर धोक्याच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे. संपूर्ण जग भयभीत झालेले असताना जागतिक आरोग्य संघटनेने मात्र मौन धारण केले आहे.

सहा वर्षांपूर्वी चीनच्या बुहांग प्रांतातील एका संशोधन प्रयोगशाळेतून कोविड 19 हा विषाणू बाहेर पडला होता. हा विषाणू बाहेर पडावा अशीच तेथील संशोधकांनी मुद्दाम केलेली ती चूक होती असे तेव्हा जगभर(world) बोलले जात होते. चिनी ड्रॅगनने मात्र आपले हात तेव्हा झटकले होते. मात्र कोविड 19 ची सुरुवात चीन प्रांतातून झाली होती हे मात्र निर्विवाद सत्य होते. कोविड ने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. करोडो लोकांचा बळी या विषाणू ने घेतला होता. साऱ्या जगाची आर्थिक कोंडी झाली होती. महासत्तांची अर्थव्यवस्था कोसळली होती.

अब्जावधी लोकांच्या नोकऱ्या आणि रोजगार या कोविड ने गिळंकृत केला होता. त्याला भारत सुद्धा अपवाद नव्हता. मोठ्या प्रमाणावर जीवित आणि रोजगार हानी तेव्हा झाली होती. पहिली लाट, दुसरी लाट येऊन गेल्यानंतर मृत्यूची तिसरी लाट येता येता सुदैवाने थांबली होती. भयचकीत अवस्थेतून जगाला बाहेर पडण्यासाठी काही समय द्यावा लागला होता. या भीषण संकटाची आठवण करून देणारा एच एम पी व्ही हा नवा विषाणू आता चीनमध्ये धुमाकूळ घालून लागला असल्याच्या बातम्या बाहेर येऊ लागल्यानंतर संपूर्ण जगाची चिंता वाढलेली आहे. वास्तविक जगाने धास्ती घेतलेल्या या नव्या विषाणूबद्दल नेमकी वस्तुस्थिती किंवा वास्तव समोर आणण्याची जबाबदारी जागतिक आरोग्य संघटनेची आहे मात्र या संघटने कडून कोणत्याही प्रकारचा खुलासा अद्याप पर्यंत करण्यात आलेला नाही आणि म्हणूनच भारतासह सर्व देशांची चिंता वाढलेली आहे.

“ह्यूमन मो पन्यू व्हायरस” असे या नव्या व्हायरसचे नाव आहे. चीनमध्ये अनेक शहरात त्याने धुमाकूळ घातला आहे. तेथील हॉस्पिटल मधील वाढलेली लगबग, वैद्यकीय अधिकाऱ्यांची उडालेली धावपळ, स्मशान्यभूमी मधील गर्दी याचे काही व्हिडिओ गेल्या चार दिवसांपासून व्हायरल होऊ लागल्यामुळे या नव्या विषानुसार अनेक देशांनी धसका घेतला आहे.

चीन देशातील एच एम पी व्ही हा जीवितास अतिशय घातक असलेला व्हायरस भारतामध्ये येऊ शकतो का? किंवा अशा प्रकारचा व्हायरस खरोखरच चीनमध्ये तयार झालेला आहे काय? याबद्दलची अधिकृत माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्वसामान्य जनतेला दिलेली नाही. त्यामुळे त्याचा भारतीय(world) धसका घेतला पाहिजे अशी आज तरी परिस्थिती नाही. तथापि भविष्यात हा धोका भारताच्या उंबरठ्यावर येणारच नाही असे नाही.

या नव्या व्हायरसची लक्षणे सर्वसाधारणच आहेत. खोकला, श्वास घ्यायला अडथळा येणे, धाप लागणे, अशी सर्वसाधारण लक्षणे या नव्या व्हायरसची आहेत. अशा प्रकारचा प्राकृतिक त्रास एरवी सुद्धा होत असतो. त्यामुळे तो धोकादायक व्हायरस आहे किंवा कसे हे कळावयास मार्ग नाही. मायक्रो प्राजमा, निमोनिया आणि कोविड या विषाणू पैकीच हा एच एम पी व्ही हा व्हायरस आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या व्हायरस बद्दल सावधगिरीचा इशारा दिलेला नाही, त्यामुळे या व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर जी लक्षणे दिसत अशीच लक्षणे एखाद्याला दिसली तरी त्यांनी घाबरून जायचे कारण नाही. कारण ही लक्षणे सर्वसाधारण असू शकतात.

एच एम पी व्ही विषाणूचा संसर्ग हा ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा व्यक्तीलाच होऊ शकतो. त्यामुळे या विषाणूचा धसका घेण्याऐवजी आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रत्येकाने सतर्क, सजग राहिले पाहिजे.
प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे असे दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधाची उपायोजना करणे हिताचे ठरेल.

हेही वाचा :

‘मातोश्री’वर वादाची ठिणगी! उद्धव ठाकरे यांचा नेत्याला संतप्त इशारा – ‘भाजपात जायचं असेल तर जा’

उर्वशी रौतेलाचा थर्टी फर्स्ट जोरदार; फक्त एक परफॉरमन्स आणि घेतले इतके कोटी रुपये

२०२५ ची निराशाजनक सुरुवात: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव, मालिकाही गमावली