सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याला जग्गूदादाने डोक्यात मारली टपली नेटकरी म्हणाले..

जॅकी श्रॉफ ८० आणि ९० च्या दशकातील बॉलिवूडमधील लोकप्रिय(selfie mirror) अभिनेते आहेत. जग्गुदादांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मने जिंकले आहेत. जॅकी श्रॉफ यांना चाहते लाडाने जग्गुदादा म्हणतात. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारे जॅकी श्रॉफ सध्या त्यांच्या स्वभावामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या स्वभावाची नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते.

कायमच आपल्या मिश्किल स्वभावाने चाहत्यांना हसवणाऱ्या(selfie mirror) जग्गुदादाची इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. सेल्फी घेण्यासाठी आलेल्या फॅन्ससोबत जग्गुदादा व्यवस्थित न वागल्याने, नेटकरी त्यांच्यावर भडकले. जग्गुदादांची वागणुक नेटकऱ्यांना आवडलेली नाहीय.

ईन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजने एक व्हिडीओ शेअर केलाय. त्या व्हिडीओमध्ये जग्गूदादांकडे काही चाहते सेल्फी घेण्यासाठी येत आहेत. ते त्यांच्यासोबत व्यवस्थित वागताना दिसत नाहीत. त्यांच्याकडे आलेल्या फॅन्सला जग्गूदादा त्याच्या डोक्यात एक टपली मारताना दिसत आहेत. याशिवाय एक फॅन सेल्फी घेताना वेगळ्या ठिकाणी हात ठेवतो. “खाली हात काय ठेवतोय. असा हात ठेवायचा.” असं म्हणत जग्गूदादा त्या फॅनला शिकवतात आणि त्याच्यासोबत सेल्फी काढतात.

जग्गूदादाचीही मस्करी चाहत्यांना आवडलेली नाही. त्यामुळे नेटकऱ्यांकडून जग्गूदादा जोरदार ट्रोल होत आहेत. जग्गूदादाच्या ह्या व्हिडीओवर नेटकरी म्हणतात, ‘कशाला उगाच त्याला मारत आहेत, पागल आहे का ?’, ‘याला स्टाईल नाही, मस्ती मस्तीमध्ये हात साफ करणे म्हणतात’ तर अनेकजण त्यांच्या वागणुकीबद्दल नाराज आहेत. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नेटकरी त्यांच्या वागणुकीमुळे नाराज आहेत.

जॅकी श्रॉफ यांच्या कामाबद्दल सांगायचे तर, गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘मस्त मे रहने का’ चित्रपटात त्यांनी अभिनय केला. हा चित्रपट प्राईम व्हिडीओ या ओटीटीवर रिलीज झाला. लवकरच जॅकी श्रॉफ वरुण धवनसोबत ‘बेबी जॉन’ चित्रपटात एकत्रित स्क्रिन शेअर करणार आहेत. चित्रपटाची अद्याप रिलीज डेट जाहीर झाली नसून चित्रपट २०२४ मध्येच रिलीज होणार आहेत.

हेही वाचा :

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ 6 भत्त्यांमध्ये होणार मोठे बदल

कशी आहे धोनीने जाहिरात केलेली इलेक्ट्रिक सायकल? किती आहे किंमत?

‘सांगलीत जनावरांना जरी विचारलं, तरी ते..’; विश्वजीत कदमांचा राऊतांवर थेट हल्लाबोल