जयसिंगपुरात पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून पतीची गळफासाने आत्महत्या!

जयसिंगपूर येथील दत्त हौसिंग सोसायटीत चारित्र्याचा संशय (character) घेऊन पत्नी कोमल कृष्णा धंगेकर हिच्यावर धारदार शस्त्राने वार करून पती कृष्णा लक्ष्मण धंगेकर (वय 38) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली.

दरम्यान, कृष्णा यांनी चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे मेहुणी दीपाली राजेंद्र हरकल, साडू राजेंद्र हरकल (वय 42, दोघे रा. जयसिंगपूर), दुसरी मेहुणी सरला गोडसे (रा. नाशिक) व चिपरी (ता. शिरोळ) येथील विजय धाब्याचे विजय महादेव येवले (29) यांच्याविरोधात विजय मुरलीधर धंगेकर यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. यापैकी विजय येवले व राजेंद्र हरकल या दोघांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली आहे. तर जखमी पत्नी कोमल कृष्णा धंगेकर हिच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धंगेकर पती-पत्नी येथील दत्त कॉलनीत संजय वैद्य यांच्या घरात भाड्याने राहतात. कृष्णा धंगेकर यांनी मंगळवारी मध्यरात्री (character) पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाय, धंगेकर यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत असे म्हटले आहे की, माझे दुसरे लग्न झाले आहे. तरी माझी मेहुणी दीपाली हरकल हिने मला वारंवार मानसिक त्रास दिला आहे.

माझ्या बायकोच्या नावावर पैसे काढून भरले नाहीत. आमच्या नवरा-बायकोत सारखी भांडणे लावून वाईट मार्गाला लावण्याचे काम केले आहे. यातून कोमल हिचे हॉटेल विजय धाब्याचे विजय येवले याच्याबरोबर अनैतिक संबंध असल्याचे मला कळाले आहे. शिवाय, हे कृत्य तिच्या बहिणीच्या सांगण्यावरून केले आहे. या सर्वांनी मला मानसिक त्रास दिला आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असे यात म्हटले आहे.

शिवाय, या चिठ्ठीत दीपाली हरकल, राजेंद्र हरकल, सरला गोडसे, विजय येवले यांची नावे घालून सही केली आहे. यावरून विजय धंगेकर यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.

हेही वाचा :


सांगली : कुपवाडमध्ये तरुणावर कोयत्याने हल्ला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *