कोल्हापूर: कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन मतदारसंघातील(camping near me) महायुतीच्या विजयासाठी पंधरा दिवसांत चार वेळा जिल्ह्यात येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता येथेच प्रचार समाप्तीपर्यंत तळ ठोकून राहणार आहेत. या दोन्ही जागा मुख्यमंत्र्यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. यामुळे त्यांचे दौरे वाढले आहेत.
कोल्हापुरातून संजय मंडलिक, तर हातकणंगलेतून धैर्यशील माने शिवसेनेच्या(camping near me) चिन्हावर मैदानात उतरले आहेत. या दोन्ही जागा आग्रह करून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या पदरात पाडून घेतल्या; पण कोल्हापुरात शाहू महाराज आणि हातकणंगलेत राजू शेट्टी यांच्यामुळे प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.
यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेकांच्या सभा झाल्या. मुख्यमंत्री शिंदे उमेदवारांचे अर्ज भरायला आले. त्यानंतर दोन वेळा येऊन जुळणी लावून गेले. पंतप्रधानांच्या सभेला आले. आता पुन्हा ते कोल्हापुरात आले आहेत. रविवारी प्रचारफेरी काढून ते प्रचाराची सांगता करणार आहेत.
शिवसेनेने या दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या केल्याने मुख्यमंत्री येथे तळ ठोकून आहेत. प्रत्येक नेत्याला भेटून नाराजी दूर करण्यापासून ते इतर मनधरणीपर्यंत सर्व प्रक्रियेत ते आघाडीवर आहेत. एका जिल्ह्यात एवढे दिवस मुख्यमंत्र्यांनी मुक्काम करणे पहिल्यांदाच घडत आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही भेटून विजयासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्याची विनंती करीत आहेत. तीन दिवस कोल्हापुरात राहून ते शेवटच्या टप्प्यात जुळणी लावत आहेत.
हेही वाचा :
कोण गरजले, कोण बरसले कोणाचे नेमके कुठे बिनसले?
संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात ‘टशन’; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी
सांगली : वंचितचा पक्ष वंचितांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी? प्रकाश शेंडगेंचा सवाल