कोल्हापूर लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; सट्टाबाजारात उलाढाल जोरात

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख(market) जशी जवळ येईल तशी कोण विजयी होणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आपलाच उमेदवार विजयी होणार यावर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत पैजा रंगल्या असून, पोलिसांना चकवा देत कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर सट्टाबाजारातील उलाढालही जोरात सुरू आहे.

जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघांत(market) सात मे रोजी मतदान झाले. आज (ता. २०) राज्यातील लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्याचे मतदान होत आहे. या निवडणुकीची मतमोजणी चार जून रोजी होत आहे. निकालाची तारीख जवळ येईल तशी उत्सुकता ताणू लागली आहेच, पण त्याचबरोबर कार्यकर्त्यांची धाकधूकही वाढू लागली आहे.

कोल्हापूर मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत विद्यमान खासदार महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक व काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यातच आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात २७ उमेदवार रिंगणात असले तरी विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर व माजी खासदार राजू शेट्टी यांचे आव्हान आहे. या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत ‘वंचित’च्या उमेदवाराला पडलेल्या मतांमुळे निकाल फिरला होता.

यावेळीही ‘वंचित’कडून रिंगणात असलेले डी. सी. पाटील किती मते घेणार, त्यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे. मतदान होऊन १८ दिवस झाले तरी केंद्रनिहाय मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाही. याबाबत निवडणूक आयोगाकडून प्रशासनाने खुलासा मागवला आहे.

पण, मतदानादिवशी उपस्थित उमेदवार प्रतिनिधींकडून गावनिहाय मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवरून विजयाचे गणित बांधले जात आहे. मतदानानंतर लगेच तशी आकडेमोड करून किती मतांनी आपला उमदेवार विजयी होईल, याचे आडाखे बांधले गेले. आता राज्यातील निवडणुकीचे सर्वच टप्पे संपल्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत आकडेमोड सुरू झाली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा परिसरातील शासकीय गोदामात, तर हातकणंगलेची मतमोजणी राजाराम तलाव परिसरातील गोदामात होणार आहे. या दोन्ही ठिकाणी केंद्रीय राखीव दलाच्या पोलिस बंदोबस्तात मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. या परिसरात २४ तास पोलिसांचा खडा पहारा असून, मतदान यंत्रे ठेवलेल्या परिसरात कोणाला सोडले जात नाही. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे.

मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँगरूमबाहेर पोलिसांचा २४ तास खडा पहारा आहे. तरीही उमेदवारांकडूनही दोन्ही ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांचा राबता ठेवण्यात आला आहे. रमणमळा परिसरात तर एका उमेदवारांनी २४ तास स्वतःच्या खर्चातून सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. याशिवाय दर चार तासांनी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांची नियुक्ती या परिसरात करण्यात आली आहे.

हेही वाचा :

मुंबईत मोठा गोंधळ, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; शिवसैनिक आक्रमक

डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

“एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले…” थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा