लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार सात जणांवर गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार  सात जणांवर गुन्हा

कोल्हापूर: बावीस वर्षीय युवतीला लग्नाचे(marriage) आमिष दाखवून जवळीक साधून लॉजवर नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून अश्लिल फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची

भिती दाखवून आर्थिक फसवणूकही केली. या प्रकरणी युवकासह सातजणांवर गोकुळ शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

ऋषीकेश पाटील, संगीता पाटील, साताप्पा पाटील, रितेश पाटील, रूपेश पाटील, गीता यादव, साक्षी (रा. सर्व कंदलगांव) अशी संशयीतांची नावे आहेत. कंदलगावात राहणारा ऋषीकेश पाटील याने एका मुलीसोबत मैत्री करून नोव्हेंबर २०१९ ते १४ जानेवारी २२ या कालावधीत या युवतीच्या राहत्या घरी व पुणे येथे लॉजवर नेऊन तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर युवतीस जातीवाचक अपशब्द वापरून लग्न(marriage) करण्यास नकार दिला. लॉजवर काढलेले अश्लिल फोटो व व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे युवतीने फिर्यादीत म्हटले आहे.

 

Smart News:-

कोल्हापूरला खंडपीठ होणे गरजेचे राऊत यांचे वक्तव्य


‘क्‍वाड’ बैठकीतून काय साधले?


निखतच्या जिद्दीची कहाणी


सतत थकल्यासारखं वाटतं? १५ दिवसात रक्ताची कमतरता दूर करतील रोजच्या जेवणातले ४ ‘फूड कॉम्बिनेशन्स’


उत्तर प्रदेशात महिलांना रात्री डय़ुटी करता येणार नाही


 

Leave a Reply

Your email address will not be published.