हुबळी जवळ भीषण अपघात कोल्हापूरचे ६ जण ठार !

कोल्हापूरहून बंगळूरकडे जाणारी खासगी बस (travels) आणि तांदूळ वाहून नेणारा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन ८ जण ठार झाले आहेत. मध्यरात्री १२ च्या सुमारास हुबळी जवळ तारीहाल क्रॉस नामक फाट्याजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये सहा जण कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.

कोल्हापूरहून हुबळीला निघालेल्या नॅशनल ट्रॅव्हल्स (travels) कंपनीच्या बसचा तसेच तांदूळ भरून निघालेल्या लॉरीची समोरासमोर धडक झाली. मृतांमध्ये ट्रक चालक, वाहक तसेच आणखी एकटा आणि बसमधील चार प्रवाशांचा समावेश आहे. बाबासाहेब (वय ५५, रा. चिकोडी), मोहम्मद दयान (वय १७, रा. मैसूर) अशी दोन मृतांची नावे आहेत.

कोल्हापूरहून चिकोडी, बेळगावसह अन्य शहरातील प्रवासी आहेत. त्यामुळे मृत व जखमी प्रवाशांमध्ये कोल्हापूरसह विविध ठिकाणचे प्रवासी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. २८ प्रवाशी जखमी असून त्यांना हुबळीच्या KIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा :


शरद पवार यांच्यावर मनसेकडून गंभीर आरोप !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *