कोल्हापूरमध्ये अग्नितांडव शॉर्टसर्किटमुळे ७ घरांना आग..!

शित्तूर वारुण पैकी कदमवाडी (ता. शाहूवाडी) येथे शार्टसर्किटने (short circuit) सात घरांना आग लागून सुमारे तीस लाख रुपयांचे नुकसान झाले. यात एकजण भाजून गंभीर जखमी झाला तर पाच शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. दोन बैल आणि एक गाय गंभीर जखमी आहेत. वीजवाहिनी जळत एका घरापर्यंत जळत आली आणि तेथून आग भडकत गेली.

याबाबत घटनास्थळावरुन तसेच शाहूवाडी तहसील कार्यालयातून मिळालेली माहिती अशी ः कदमवाडी येथे बुधवारी पहाटे दोन वाजून ४० मिनिटांनी एका घरास शार्टसर्किटने (short circuit) आग लागली. ही बाब मारुती नामदेव कदम यांच्या निदर्शनास आली. त्यांनी गाढ झोपेत असणाऱ्या लोकांना उठवण्याचे प्रयत्न केले; पण तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. दहा मिनिटात आगीने सात घरे कवेत घेतली. गाय व बैल यांचे दोर कापताना नामदेव कुशाबा कदम भाजून गंभीर जखमी झाले.

त्यांना कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल केले आहे. आगीमध्ये दुचाकी, साठ पोती धान्य, टीव्ही, मोबाईल संच, रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, कपडे, शेती अवजारे, कपाटे, कागदपत्रे, भांडी आदी संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. शाहूवाडीचे तहसीलदार गुरु बिराजदार, मंडलाधिकारी मोहन जाधव, भेडसगाव, शित्तूर वारुण विभागाचे तलाठी, महसूल कर्मचारी यांनी पंचनामा केला.

नुकसानग्रस्त ग्रामस्थ (आकडे रुपयात)
मारुती नामदेव कदम – ४. ५८ लाख
आनंदा नामदेव कदम – ४.६५ लाख
शंकर नामदेव कदम ३.६६ लाख
सविता राजाराम कदम ३.१४ लाख
पारुबाई नामदेव कदम ३.४० लाख
रामचंद्र कुशाबा कदम ४. ५३ लाख
भरत रामचंद्र कदम ५. ६२ लाख

“शार्टसर्किटने घराला लागलेल्या आगीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला जाईल. संबंधित कार्यालयाकडून चौकशी केली जाईल.”

– पवन माने, शाखा अभियंता, महावितरण भेडसगाव

“जळीतग्रस्त कुटुंबाला शासनातर्फे मदत केली जाईल. ग्रामस्थांनी नुकसानग्रस्त कुटुंबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे.”

– गुरु बिराजदार, तहसीलदार, शाहूवाडी

“या दुर्घटनेला महावितरण पूर्णपणे जबाबदार आहे. कदमवाडीतील वीज खांब सडले व गंजलेले आहेत. काही झुकले असून ते कोणत्याहीक्षणी कोसळतील, अशा स्थितीत आहे. तसे घडले तर वित्त आणि जीवितहानी होणार आहे. असे खांब तातडीने बदलण्याची मागणी वारंवार केली होती.”

हेही वाचा :


BREAKING: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *