खळबळजनक ! कोल्हापूर मध्ये घडला भयावह अपघात!

बेदरकार भरधाव डंपरने (dumper) मोटरसायकलला दिलेल्या धडकेत पिता पुत्र जागीच ठार झाले तर पत्नी गंभीर जखमी झाली. या भयावह अपघातात पितापुत्रांची डोकी धडावेगळी झाली होती. अंकुश शिवाजी साळुंखे (वय ४०), आदित्य अंकुश साळुंखे (वय १४) अशी मृत पिता पुत्रांची, तर सोनाली अंकुश साळुंखे (वय ३४ रा. हजारमाची) असे जखमीचे नाव आहे.आष्टा – इस्लामपूर रस्त्यावर मंगळवारी सकाळी ९ वाजता हा अपघात झाला. पोलिस निरिक्षक अजीत सिद्ध, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनमित राऊत यांनी घटनास्थळी भेट देवून मदतकार्य केले.

घटनास्थळावरून याबाबतची मिळालेली माहिती अशी, मयत अंकुश हे पत्नी सोनाली, मुलगा आदित्य यांना घेवुन सीडी डीलक्स मोटरसायकल (क्र.mh -50-R-1676) वरून आष्ट्याकडून इस्लामपूरच्या दिशेने निघाले होते.आहिरवाडी फाटा वळणावर आले असता इस्लामपूर कडून आष्ट्याकडे निघालेल्या भरधाव (dumper) डंपरने साईड बदलून मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की धडकेत अंकुश व आदित्य दोघे जागीच ठार जाले. तर सोनाली या गंभीर जखमी झाल्या. डंपर चालकांने बेदरकापणे डंपर न थांबवता आष्ट्याच्या दिशेने पळविला. घटनास्थळी प्रवाशांची गर्दी झाली. पोलिसांना माहिती दिली.

The father and son were killed on the spot when the dumper hit the motorcycle

घटनास्थळीचे चित्र पाहून लोक अचंबित होते. आदित्यच्या डोक्यावरुन चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. तर अंकुश यांच्या धडाला डोकंच नव्हते. उपस्थीत सर्वचजण परिसरात डोक्याचा शोध घेत होते. पोलिस निरिक्षक अजीत सिद, मनमित राऊत घटनास्थळी आले. नागरिकांनी माहिती दिली. अंकुश यांचे डोके डंपर मधे अडकून पुढे गेल्याचे समजले. पोलिसांकडून डोके मिळवण्यासाठी  डंपरचा शोध सुरु होता.

घटनास्थळाचे दृश्य मन हेलवणारे होते. गाडीचे पुढील चाक तुटले होते. मेंदू इतस्ततः पडला होता. रुग्णवाहिका चालक साजन अवघडे,ओंकार डांगे यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवले. घटना स्थळ रक्तरंजीत झाले होते.

मागील महिन्यात याच रस्त्यावरील तुजारपूर फाटा येथे झालेल्या अपघातात कराड आगाशिव येथील एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले होते.तर आठवडयापुर्वी बावची फाटा येथे सांगली येथील युवक ठार झाला होता आज अहिरवाडी फाटा येथे पिता-पुत्र मयत झाल्याने पंधरा दिवसात रस्त्यावरील पंधरा किलोमीटरच्या अंतरामध्ये आठ जण मयत झाले तर दहा  जण  जखमी झाले आहेत.

हेही वाचा :


निरोगी राहण्यासाठी या 3 पदार्थांचा आहारात नक्कीच समावेश करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *