कोल्हापूरसह इचलकरंजी मध्ये आकाशात दिसली उडती तबकडी?

jotiba temple

पन्हाळ्यात आकाशात पश्चिम दिशेला उंच पांढरेशुभ्र आणि चकाकत असलेले उडती तबकडी सदृश्य काहीतरी दिसून आले आहे. यामुळे याचे पन्हाळकरांना कुतूहल (curiosity) लागले आहे. आज सकाळी तब्बल दोन तास पश्चिमेला आकाशात उंच असा बलून सदृश (पण बलून नाही) एक पांढरा शुभ्र गोल अचानक दिसत होता. हा गोल अत्यंत कमी वेगाने पुढे सरकत असल्याचे जाणवत होते.

पन्हाळा येथील रमेश पाटील, दीपक दळवी, अस्मिता पाटील, मालती पाटील, सीमा माळी, विजय यांनी दोन तास त्याचे निरीक्षण केले, हा गोल उत्तर दिशेला सरकत गेला आणि मग पन्हाळ्यातून दिसेनासा झाला, असे रमेश पाटील यांनी सांगितले. रमेश पाटील यांनी आपल्या मोबाईलवर या घटनेचा व्हिडिओ बनवला.

curiosity

अचानक डोळ्याने पहाता येईल अशी पण विमान जातात त्याहीपेक्षा खूप उंच अंतरावरून ही वस्तू आकाशात पाहायला मिळाल्याने नागरिकांत हे काय असेल याचे कुतूहल निर्माण झाले आहे. पन्हाळा येथे शिवाजी विद्यापीठाचे अवकाश संशोधन केंद्र आहे. या केंद्राच्या माध्यमातून यावस्तूचा अभ्यास व्हावा व आकाशात आज जे काही दिसले ते काय होते? याची मिळावी अशी पन्हाळावासीयांची अपेक्षा आहे.दरम्यान, इचलकरंजी, कबनूर येथूनही अशीच तबकडी सदृश्य वस्तू आकाशात दिसल्याने आश्चर्य (curiosity) व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा :


मी सीडी काढली तर महाराष्ट्र हादरेल : करुणा शर्मा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *