कोल्हापुरात फलक वाद पेटला…

panel debated

विजयसिंह देसाईच्या घरावर हल्ला…

कोल्हापूर: फलक वादाचे(panel dispute) पडसाद पुन्हा एकदा रविवारी पहाटे पाहायला मिळाले फुलेवाडी रिंगरोड परिसरातील राहणाऱ्या विजयसिंह ऊर्फ रिंकू देसाई यांच्या घरावर तिघा अज्ञातांनी हल्ला केला. खिडकीच्या काचा,दारातील कुंड्यांची तोडफोड करण्यात आली. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे. परिसरातील एका किराणा दुकानावरही दगडफेक करून दहशत माजवली. घडलेल्या या प्रकरामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

करवीर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजयसिंह उर्फ रिंकू देसाई यांचा आठ दिवसापूर्वी वाढदिवस झाला. दरम्यान फलक फाडण्याच्या(panel dispute) कारणावरून लक्षतीर्थ वसाहत येथे दोन तरूणांवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्याचे पडसाद पहाटे उमटले. रिंकू देसाई यांच्या घरावर तोंडाला रुमाल बांधलेल्या तिघा अज्ञातांनी हल्ला केला. त्यांनी दारातील कुंड्या फोडल्या. त्यानंतर खिडक्यांवर दगडफेक करून त्याच्या काचा फोडल्या. सुमारे अर्धातास हा धुडगूस सुरू होता.

हा प्रकार परिसरातील सीसी टीव्हीतही कैद झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी परिसरातील एका दुकानांवरही दगड मारले. त्यामुळे परिसरात गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात विश्वजित फाले आणि सौरभ जाधव या दोघा संशयितांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याच्यावर स्थानिक गुन्हे अनेवेषण शाखेने प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे प्रक्रिया सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Smart News:-

Hyundai, Tata चं टेन्शन वाढणार, Maruti Suzuki दोन जबरदस्त नव्या गाड्या लाँच करणार!


RCB ‘Virat Kohli मुळे बाहेर, आता तरी संन्यास घे’, विराटवर अभिनेत्याचा संताप!


भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार जाहीर; गोयल, बोंडेंना संधी


IPL 2022: 1,00,000 हून अधिक लोकांसह IPL 2022 फायनलमध्ये वंदे मातरम्


महाराष्ट्राचे वीरपुत्र सुभेदार विजय शिंदे पंचत्वात विलीन; लष्कराकडून मानवंदना


 

Leave a Reply

Your email address will not be published.