‘आप’ची आता कोल्हापूरमध्ये एन्ट्री; काँग्रेस-भाजपला देणार टक्कर!

Aam Aadmi Party

कोल्हापुरातील काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव  यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची (Kolhapur North by election) जागा रिक्त आहे. या जागेवर बिनविरोध निवडणूक व्हावी, असा सत्ताधारी पक्षाचा मानस आहे. पण याआधीच्या राज्यातील झालेल्या पोटनिवडणुका पाहता कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी बघायला मिळणार आहे. भाजप या जागेवर आपला उमेदवार देणार आहे. त्यासोबतच आता या निवडणुकीच्या रिंगणात आम आदमी पक्षाचाही (Aam Aadmi Party) उमेदवार असणार आहे.

आम आदमी पक्ष महाराष्ट्रात एन्ट्रीच्या तयारीत

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये दमदार एन्ट्री करत एकहाती सत्ता मिळवली. तर गोव्यातही आपले आमदार निवडून आणण्यात यश मिळवलं आहे. त्यानंतर आता आम आदमी पक्ष (aam aadmi party) कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उडी घेऊन महाराष्ट्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे.

कोण असणार उमेदवार?

आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे हे कोल्हापुरात दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी या निवडणुकीत आपण उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे आज-उद्यामध्ये आम आदमी पक्षाकडून कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Aam Aadmi Party

करुणा शर्माही निवडणुकीच्या रिंगणात

कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्ह आहेत. कारण या निवडणुकीत करुणा शर्मा या सुद्धा उतरणार आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांमुले करुणा शर्मा चर्चेत आल्या. त्यानंतर आता आगामी पोटनिवडणुकीत त्या शिवशक्ती सेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :


बँकेच्या ‘या’ योजनेत मिळवा दुहेरी फायदा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *