कुरुंदवाडमध्ये ट्रॅक्टरवरचा ताबा सुटून घडली मोठी दुर्घटना

accident news

कुरुंदवाड दरम्यानच्या मजरेवाडी रस्त्यावर ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून चालक (accident news) ठार झाला. सचिन भीमराय चव्हाण (वय २९, रा. जलगिरी, जि. विजापूर) असे मृत ट्रॅक्टर चालकाचं नाव आहे.

रस्त्यावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी सपोनि बालाजी भांगे यांनी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करून जमाव पांगवला. सचिन चव्हाण हा आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर व ट्रॉली घेऊन ऊस भरण्यासाठी कुरुंदवाडकडे जात होता.

मजरेवाडी रस्त्यावरील भबीरे मळ्याजवळ साडेअकरा वाजता सुमारास रस्त्यालगत पडलेल्या खडीवरून ट्रॅक्टर जम्प झाला. ट्रॅक्टरवरील चालक सचिनचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टरमधून तो खाली पडला. यावेळी मोठे चाक पोटावरुन गेल्याने तो जागीच ठार (accident news) झाला.

हा ट्रॅक्टर कर्नाटक राज्यातील व्यक्तीच्या मालकीच्या असून त्यावर सचिन चव्हाण हा चालक म्हणून काम करत होता. येथील पोलिसात मृत्यूची नोंद झाली आहे. वर्दी सागर बापूसाहेब सूर्यवंशी यांनी दिली आहे.


हेही वाचा :


या आठवड्यात सर्व बँका 4 दिवस राहणार बंद !


‘या’ वयात सर्वाधिक लोकं मद्यपान करतात, धक्कादायक खुलासा


महाराष्ट्रातील राजकारणाबाबत वर्तवलं मोठं भाकित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *