गुणरत्न सदावर्तेंना आणखी एक झटका; कोल्हापूर पोलीस घेणार ताबा!

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला आहे. मराठा समाजाबद्दल द्वेष निर्माण केल्याप्रकरणी कोल्हापूरमध्ये सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता कोल्हापूर पोलिसांकडे सदावर्तेंचा ताबा देण्यात आला आहे. कोल्हापूर पोलीस सदावर्तेंच्या ताब्यासाठी सकाळी मुंबईच्या कोर्टात court  हजर झाले होते.

सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूर पोलीस मुंबईतील ऑर्थर रोड जेलकडे रवाना होणार आहेत. आधी मुंबई पोलीस त्यानंतर सातारा पोलीस आणि आता कोल्हापूर पोलीस यांनी सदावर्तेंचा ताबा घेतला आहे. त्यामुळं त्यांच्यामागची संकटाची मालिका संपताना दिसत नाहीए. याशिवाय सदावर्तेंविरोधात सदावर्तेंविरोधात आणखी गुन्हे दाखल आहेत.

कोल्हापूर आणि अकोला पोलीस सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी आज कोर्टात court  दाखल झाले होते. यामध्ये पहिल्यांदा कोल्हापूर पोलिसांकडे त्यांचा ताबा देण्यात आला. चौकशीनंतर सदावर्तेंना पुन्हा न्यायालयीन कोठडी मिळेल तेव्हा अकोला पोलिसांना त्यांचा ताबा  मिळू शकेल.

हेही वाचा :


प्रसिद्ध अभिनेत्री देतेय या गंभीर आजाराशी लढा..!

Leave a Reply

Your email address will not be published.