कोल्हापुरात उद्यापासून सैन्यदलाची अग्निवीर भरती;

कोल्हापूर: कोल्हापुरात अग्निवीर सैन्य भरतीची (army recruitm) प्रक्रिया मंगळवार म्हणजे २२ तारखेपासून सुरू होत आहे. ११ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या भरतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर या भरतीची तयारी सुरू असून साधारण ९८ हजार तरुणांनी भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे. अग्निवीर योजनेच्या विरोधात देशभर आंदोलने झाली असली तरी प्रत्यक्षात भरतीवेळी वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि गोवा इथले तरुण या भरतीमध्ये सहभागी होणार आहेत. एकाच वेळी तरुणांची गर्दी होऊ नये यासाठी दररोज पाच हजार तरुणांना भरती प्रक्रियेसाठी बोलवले जाणार आहे.


यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात मुंबई आणि परिसरातील आठ जिल्ह्यांतील ‘अग्निवीर’ भरतीची प्रक्रिया पार पडली होती. मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, नंदुरबार व धुळे, या जिल्ह्यांतील युवक या भरतीत सहभागी झाले होते. यावेळी उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी व वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती.
काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी अग्निपथ योजना घोषित केली होती. अंतर्गत संपूर्ण देशभरात अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या फेरीत भारतीय लष्कराकडून २५ हजार अग्निवीरांची भरती केली जाईल. अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लार्क, स्टोअरकीपर आणि अग्निवीर ट्रेड्समन या पदांसाठी ही भरती होणार आहे. या प्रक्रियेतंर्गत १७ ते २३ वयोगटातील तरुणांना चार वर्षांसाठी लष्करात काम करण्याची संधी मिळणार आहे. चार वर्षांनंतर त्यांना निर्वाहभत्ताही दिला जाणार असून, भरती होणाऱ्या अग्निवीरांपैकी २५ टक्के अग्निवीरांना लष्करातच आणखी काही वर्षे काम करण्याची संधी दिली जाणार आहे.

कशी असणार भरती प्रक्रिया?

भारतीय सैन्यदलाकडून (army recruitm)प्रथमच अग्नीवीर संकल्पना समोर आली मात्र अग्नीवीर भरतीसाठी सुरुवातीला काही राजकीय पक्ष आणि तरुणांच्या संघटनांनी जोरदार विरोध केला मात्र भरती प्रक्रिया सुरू होताच यासाठी तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.उद्या म्हणजे २२ नोव्हेंबरपासून कोल्हापुरात सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी तब्बल ९८ हजार उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. राजाराम कॉलेजचे मैदान आणि शिवाजी विद्यापीठातील मैदानावर ही भरती प्रक्रिया पार पडणार असून यांची पूर्वतयारी आता पूर्ण झाली आहे. ही भरती कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, बेळगावसह गोव्यातील उमेदवारांचा यात समावेश होणार आहे. उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे भरती प्रक्रिया ११ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तर एकाच दिवशी उमेदवारांची गर्दी होऊ नये, यासाठी तालुकानिहाय रोज पाच हजार उमेदवारांना भरतीसाठी बोलवले जाणार आहे.मोठ्या प्रमाणात भेटीसाठी विद्यार्थी येत असल्याने राजाराम कॉलेजच्या मैदानावर कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे.

सामाजिक संस्था अग्निवीरांच्या सेवेसाठी

सैन्य भरतीसाठी येणारे हजारो तरुण भरती(army recruitm) प्रक्रियेच्या आधीच एक-दोन दिवस शहरात येतात. जागा मिळेल तिथे तरुण आसरा घेतात. सध्या थंडीचे दिवस सुरू असल्याने तरुणांची गैरसोय होणार आहे, त्यामुळे टेंबलाईवाडी, उचगाव, सरनोबतवाडी, प्रतिभानगर, सायबर परिसरातील सामाजिक संस्था आणि मंडळांनी तरुणांना राहण्यासाठी हॉल, सभागृहांमध्ये सोय करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.तर राजाराम कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठ या ठिकाणी उमेदवारांसाठी पाणी आणि शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. व्हाईट आर्मी कडून उमेदवारांसाठी अन्नछत्र चालवले जाणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

उलटी करण्यासाठी रुळांकडे गेला, ट्रेनची धडक; धुळ्यातील तरुणाचं अग्निवीर होण्याचं स्वप्न अधुरं

अग्निवीर उमेदवारासाठी आवश्यक कागदपत्रे

1) दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र

२) बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र/३ वर्षांचा इंजिनीअरिंग डिप्लोमा गुणपत्रिका/दोन वर्षांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची गुणपत्रिका
३) अलीकडे क्लिक केलेला पासपोर्ट आकाराचा (१०केबी ते ५० केबी पर्यंत) रंगीत फोटो
४) स्कॅन केलेला डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
५) सहीचा स्कॅन केलेला फोटो
६) पालकांच्या सहीचा स्कॅन केलेला फोटो
७) डिप्लोमा किंवा दहावी/बारावीमध्ये इंग्रजी विषयाचे गुण दर्शविणारी मार्कशीट
८) आधार कार्ड
९) जम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालयमधील उमेदवारांना आधार क्रमांक भरण्यापासून सवलत देण्यात आली आहे.
१०) वैध आयडी आणि मोबाईल नंबर

हेही वाचा: