चंद्रकांतदादांनी शिवसेनेच्या पाठीत खंजिर खुपसला’..!

assembly

कोल्हापूर उत्तर विधानसभा (assembly) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. भाजप उमेदवार सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दसरा चौकातून रॅली काढण्यात येत आहे. भाजप प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी उपस्थिती दर्शवली. काॅंग्रेसमधून जयश्री जाधव या मोजक्याच कार्यकर्त्यांसमवेत अर्ज भरणार आहेत. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे. शिवसैनिकांनो सावध राहा, बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस आहे असा निशाणा त्यांनी साधला. याला प्रत्यूत्तर सतेज पाटील (Satej Patil) यांनी दिले आहे.

सतेज पाटील म्हणाले, भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. २०१९ ला चंद्रकांतदादांनी शिवसेनेच्या पाठीत खंजिर खुपसिले हे संपूर्ण जिल्ह्याने अनुभवले आहे. त्यामुळे शिवसैनिक खोट्या आरोपाला फसणार नाहीत याची मला खात्री आहे. निवडणूक लढवून चूक केली आहे हे भाजपाच्या लक्षात आले आहे. भाजप आणि शिवसेना यांची युती होती. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा उमेदवार पाडण्यासाठी अपक्ष उमेदवार उभे केले. पण वेगवेगळ्या माध्यमातून ते कसे उभे केले हे सर्व शिवसैनिक उमेदवारांना माहित आहे अशी कोपरकळीही त्यांनी हाणली.(assembly)

assembly

चंद्रकांत पाटील काय म्हणाले

या निवडणूकीत शिवसैनिकांना संधी आहे. ही संधी गेली तर काॅंग्रेस कायमची बोकांडावर बसेल. त्यामुळे शिवसैनिकांनो सावध राहा असा इशारा त्यांनी दिला. संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, राऊत उद्या म्हणतील आमच्या घरचं आम्ही बघतो. रोज सकाळी टीव्ही सुरु केली की कळतं काय सुरू आहे ते असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेचा कार्यकर्ता हतबल आहे, नाराज आहे, अस्वस्थ आहे. त्यामुळे या निवडणूक योग्य ती करण्याची संधी आहे असेही ते म्हणाले.

हेही वाचा :


सलमानच्या अडचणीत मोठी वाढ..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *