social workers: कोल्हापुरात सामाजिक कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला

social workers

शहरातील फुलेवाडी रिंगरोड येथील सामाजिक कार्यकर्ते (social workers)विजयसिंह देसाई यांच्या घरावर मध्यरात्री अज्ञात तिघांनी हल्ला केला आहे. यावेळी हल्लेखोरांनी देसाई यांच्या घराची खिडकी आणि झाडांच्या कुंड्या फोडत दहशत माजवण्यात प्रयत्न केला. अज्ञात आरोपी तब्बल १५ ते २० मिनिटे धुडगूस घालत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालं आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच रात्री उशिरा करवीर आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

विजयसिंह उर्फ रिंकू देसाई (social workers)यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मे रोजी लावलेला बॅनर फाडल्यावरून लक्षतीर्थ वसाहत येथे राहणाऱ्या दोघांवर हल्ला झाला होता. या रागातून आता देसाई यांच्या घरावर हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

घटनास्थळवरून मिळालेल्या माहितीनुसार, रिंगरोड बोन्द्रेनगर येथे असणाऱ्या विजयसिंह देसाई यांच्या घरावर मध्यरात्री अडीचच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. हल्ला करणाऱ्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता. हल्लेखोरांनी तोडफोड आणि दगडफेक करून प्रचंड दहशत माजवली. यावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक जागे झाले. नागरिकांनी बाहेर येऊन पहिले असता तिघे अज्ञात देसाई यांच्या घरावर हल्ला करत होते.

नागरिकांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना कळवली. खिडक्या, कुंड्या फोडून प्रचंड शिवीगाळ करत हल्लेखोरांनी भोगम पार्क येथे असलेल्या किराणा स्टोअरचीही मोडतोड केली. या घटनेची माहिती मिळताच करावीरं आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा :


नव्या व्हेरिएंटचा शिरकाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *