शरद पवार उद्या शिरोळमध्ये..!

दत्त साखरचे संस्थापक, मा.आ.व समाजवादी नेते, स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या 7 व्या पुण्यतिथी व जन्म शताब्दी वर्षाचे औचित्य साधून उद्या माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व अशोक बंग यांना समाजभूषण पुरस्कार दिला जाणार आहे. हा पुरस्कार सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान (awarding) करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तर दै. पुढारीचे संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक,निवड समितीचे प्रमुख व दत्त साखरचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी आज पत्रकार बैठकीत दिली.(awarding)

awarding

शिरोळ येथील दत्त कारखाना कार्यस्थळावर दत्ताजीराव कदम क्रीडांगणावर पुरस्कार सोहळ्याची जयंत तयारी करण्यात आली आहे. भव्य शामियाना व व्यासपीठ, हेलिपॅड मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत कमानी, शुभेच्छा फलक, सा.रे.पाटील यांचे जीवनचरित्र सांगणारे फोटो प्रदर्शन, बैठक व्यवस्था, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई असे सुशोभीकरण करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता समाज भूषण पुरस्काराचे अनावरण करण्यात येणार आहे. 1 लाख एक हजार एकशे अकरा रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

हेही वाचा :


“एवढे सामने खेळून पण समजत नाही का?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *