दौलतच्या “तीसमारखानाला’ सैल सोडणार नाही-आमदार राजेश पाटील अथर्व प्रशासनाचा खरपूस समाचार

चंदगड (प्रतिनिधी)  : आमच्या पायात साप सोडून जर कोण तीसमार खान (breaking news today)आम्हाला पळा पळा, असे म्हणत असेल तर त्याला मी भीक घालणार नाही उलट त्याला सैल सोडणार नसल्याचा इशाराच आमदार राजेश पाटील यांनी तालुका खरेदी विक्री संघाच्या सर्वसाधारण सभेत नाव न घेता दौलतच्या प्रशासनाला दिला. अथर्व-दौलत प्रशासन संपाशी काही संबंध नसतानाही आपली नाहक आपली बदनामी करत असल्याचा धागा पकडत त्यांनी ‘दौलतवाल्या’ चा खरपूस समाचार शनिवारी घेतला.

नुकताच दौलतच्या (breaking news today)कामगारांचा पगार वाढीसाठी संप सुरू होतो. पण शेतकऱ्यांची दौलत चालावी म्हणून अजिबात अथर्व कंपनीच्या कारभारात हस्तक्षेप केला नाही. पण तरी अथर्व कंपनीचे मालक मानसिंग खोराटे विनाकारण माझे नाव संपाशी जोडून माझी नाहक बदनामी करत आहेत, हे चंदगडची स्वाभिमानी जनता कसे खपूवन घेत असल्याचा सवाल आमदार राजेश पाटील यांनी उपस्थित केला. ४५० कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या दौलत साखर कारखान्यासाठी तालुक्यातील शेतकरी, सभासद व कामगारांनी रक्ताचे पाणी करून तो उभारला आहे.

अथर्व इंटरट्रेड कंपनीने नकळतपणे शेतकरी व कामगार वर्गाला ५० कोटी रुपयांचा चुना लावला आहे. त्यामुळे भाड्याने घेतलेली दौलत नीट चालावावी अन्यथा त्याला खाली कसे खेचायचे ते आम्हाला चांगलेच माहीत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तसेच अन्याय झाल्यास पेटून उठणाऱ्या चंदगडच्या जनतेने मरगळ अन्यायाविरुद्ध उभे रहावे, त्याला आपला पाठिंबा असल्याचे ही सांगण्यास ते विसरले नाहीत.

“ त्याचीही चांगलीच जिरेल मड घेऊन रडण्यापेक्षा त्याला जमिनीवर आणायचे झाल्यास १२५० ऐवजी २५०० क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प तालुका खरेदी विक्री संघाने उभारावा जेणेकरून ‘त्या’ दौलत वाल्याचीही जिरेल आणि शेतकऱ्यांना नव्या पर्यायामुळे संधी मिळेल, अशी मागणी संघाचे माजी चेअरमन भिकू गावडे यांनी केले असता त्यासाठी जागेचा शोध सुरू असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.”

दौलतच्या प्रांगणात कै. पाटील यांचे स्मारक उभे करा
कै. आमदार नरसिंगराव पाटील यांनी दौलत कारखान्याचे ३५ वर्षे चेअरमनपद सांभाळले. शेतकऱ्यांची अडचणीत आलेली दौलत सहकारातच ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कै. आमदार पाटील यांनी शेवटी दौलत कामासाठी मुंबईत असतानाच प्राणही सोडला. त्यामुळे दौलतचा प्रांगणात त्यांचे भव्य स्मारक उभे करा, अशी मागणी बसर्गेचे माजी सरपंच वसंत चव्हाण यांनी केले.

हेही वाचा :