उचगावात २४ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी!

उचगाव ता. करवीर येथील श्रीमती अश्विनी दिलीप सावंत (वय वर्ष ३६ रा. एचपी पेट्रोल पंपाजवळ) यांच्या घरातून २४ तोळे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत नऊ लाख ६० हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. याबाबत गांधीनगर पोलिसात अज्ञाता विरोधात चोरीचा (Crime record) गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अश्विनी सावंत या महामार्गालगत असणाऱ्या एचपी पेट्रोल पंपाजवळ घरगुती खानावळ चालतात. (Crime record) घरातील भिंतीस असलेल्या खुटीवरील फळीवर ठेवण्यात आलेल्या स्टीलच्या गंजामध्ये स्टीलच्या डब्यात २४ तोळे सोन्याचे दागिने ठेवलेले होते.

यात सोन्याचे चिताक, मंगळसूत्र, लक्ष्मीहार,नेकलेस, बोरमाळ, रिंगा, टॉप्स, पाटल्या, चेन, अंगठ्या, कर्णफुले या दागिन्यांचा समावेश होता. ते बरेच दिवस बघितले नव्हते.मात्र दोन तीन दिवसांपूर्वी गंजात पाहिले असता त्यांना दागिने आढळून आले नाहीत.

म्हणून सोमवारी उशिरा गांधीनगर पोलीस ठाण्यात आश्विनी दिलीप सावंत यांनी चोरीची फिर्याद दिली. याबाबत अधिक तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले तपास करीत आहेत.

हेही वाचा :


कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण; ‘या’ ठिकाणी 84.10 रुपये पेट्रोल

Leave a Reply

Your email address will not be published.