कोल्हापूरात 34 लाखांची रोकड लंपास

robbery

स्टेशन रोडवरील ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या कार्यालयातून 34 लाख 50 हजारांची रोकड चोरट्याने लंपास (robbery) केली. कार्यालयातील तिजोरीच्या लॉकरमध्ये ही रक्कम होती. 31 जानेवारी ते 25 एप्रिल या कालावधीत बनावट चावीचा वापर करून हा प्रकार केल्याची फिर्याद विजय बजरंग मुगडे (वय 25, रा. फुलेवाडी रिंगरोड) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली.

25 एप्रिलला पैशाची (robbery) आवश्यकता असल्याने ट्रान्स्पोर्ट मालकांनी लॉकर उघडले. यावेळी येथे ठेवलेली रक्कम आढळली नाही. ही रक्कम नेमकी कोणत्?या दिवशी गेली हे त्यांनाही समजलेले नाही. लॉकरची कोणतीही मोडतोड झाली नसल्याने बनावट चावीचा वापर करून रक्कम चोरल्याचा संशय पोलिसांना आहे. शाहूपुरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.


हेही वाचा :


उत्तर प्रदेशातील लाऊडस्पीकर हटवण्यावरुन राज ठाकरेंनी केले योगींचे कौतुक


राज्यात तूर्तास मास्क सक्ती नाही : राजेश टोपे


कोल्हापूर: शहर परिसरात वळीव पावसाची हजेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *