Kolhapur; पोलिसाकडून चक्क १ कोटी लाचेची मागणी

शेत जमिनीच्या दाव्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी तक्रारदाराकडे १ कोटी लाचेची (bribe) मागणी केल्याचे पडताळणीत निष्पण झाल्याने कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील पोलीस नाईक जॉन वसंत तिवडे, (रा.कोरोची ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याच्याविरोधात शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पोलीस संशयित लाचखोर (bribe) तिवडे याचा शोध घेत आहेत.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराचे शेत जमिनीबाबत महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पुणे, खंडपीठ पुणे येथे दावा सुरु आहे. दाव्याचा निकाल प्रशासकीय सदस्य माजी जिल्हाधिकारी माने यांना सांगून तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्याचे सांगितले. त्यासाठी तुमच्या विरुध्द पार्टींने एक कोटी देण्याची तयारी दाखवली आहे त्याप्रमाणे तुम्ही देखील तयारी करा असे म्हणून लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोलीस उपअधीक्षक आदीनाथ बुथवंत यांच्याकडे तक्रार दाखल केली.

यानंतर पथकाने लाचेच्या मागणीबाबत दि.२२ मार्च २०२२ रोजी पडताळणी केली. या पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे निष्पण झाले. त्यावरुन पोलीस नाईक जॉन तिवडे याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Smart News :


किल्ल्यावर पाय घसरुन 64 वर्षीय वृद्ध दरीत कोसळला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *