कोल्हापूर: कालकुंद्री येथील मॅरेथॉन स्पर्धेत विवेक मोरेंनी मारली बाजी

Mahatma Gandhi

चंदगड : कालकुंद्री (ता. चंदगड) येथे महात्मा गांधी(Mahatma Gandhi) जयंतीनिमित्त श्री कलमेश्वर स्पोर्ट्स क्लब आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत धावपटू विवेक मोरे, हर्षद कदम, सृष्टी रेडेकर, अर्जुन पाटील यांनी विविध गटात बाजी मारत अजिंक्यपद पटकावले.

निकालात पुरुष खुला गट- विवेक मोरे (दाटे), परशराम भोई (भडगाव), ओंकार पन्हाळकर, (इचलकरंजी), प्रधान विलास किरुलकर (राधानगरी), अरूण माळवी ( महागाव), लगमाना जरळी ( दिंडलकोप), शुभम पाटील (कालकुंद्री).

खुला गट मुली – सृष्टी रेडेकर (नेसरी), रोहिणी पाटील (राधानगरी), ऋतुजा पाटील (नेसरी), भक्ती पोटे (महागाव), राधिका बागिलगेकर (कालकुंद्री), प्रेरणा जोशी (कालकुंद्री), प्राची राजगोळकर(Mahatma Gandhi).

१७ वर्षाखालील मुले गट – हर्षद कदम (राधानगरी), रोहित आडावकर (वडरगे), प्रथम पाटील (कालकुंद्री), सुहास रायकर (राधानगरी), प्रतिक पाटील (कोल्हापूर), अलोक रेडेकर, अमित धुरी (चंदगड).

१४ वर्षांखालील मुले गटात अर्जुन पाटील, युवराज जोशी (कालकुंद्री), फाल्गुन पाटील, संकेत मोरे (राजगोळी खुर्द), आदित्य खळनेकर, अनिकेत मोरे (राजगोळी खुर्द), आदित्य पाटील (कोवाड) यांनी यश मिळविले. एकूण ३०० स्पर्धक सहभागी झाले होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.

Smart News:-