चंदगड: निधी देऊनच तालुक्यातील गावांचा दौरा करणार

funds

चंदगड तालुका भाजपच्या शिष्टमंडळाला खासदार धनंजय महाडिक यांचे आश्वासन

चंदगड ( बी.टी.एन , प्रतिनिधी): चंदगड तालुका हा माझ्या घरच्या माणसांनाचाच असून माझ्या लोकसभेच्या खासदार की काळात मला मनात असतानाही काही गावांना निधी(funds) देता आला नाही पण आता ती कसर केंद्र शासनाच्या माध्यमातून निश्चित भरून काढू, असे आश्वासन भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी चंदगड तालुका भाजपाला दिले. शुक्रवारी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या शिफारशीनुसार शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.

तालुक्यातील अनेक गावांसाठी अंतर्गत रस्ते, साकव, शाळा दुरुस्ती, शाळा सुशोभीकरण, ग्रामपंचायत इमारत, सामाजिक सभागृह, व्यायाम शाळा, तलाव दुरुस्तीसाठी २० कोटी निधीची(funds) मागणी यावेळी भाजपाचे शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे खासदार महाडीक यांच्याकडे दिली. लवकरच आपण तालुक्यातील सर्व गावांचा दौरा करणार त्यांच्या विविध मागण्यांचीही पूर्तता करुन, असे आश्वासन यावेळी त्यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शांताराम पाटील, गोकुळचे माजी संचालक दिपक पाटील, युवामोर्चा अध्यक्ष अशोक कदम, ओबीसी तालुकाध्यक्ष विशाल बल्लाळ, हेऱ्याचे सरपंच पंकज तेलंग उपस्थित होते.

खासदार धनंजय महाडिक यांना विविध मागण्यांचे निवेदन चंदगड तालुका भाजपच्या शिष्टमंडळाने दिले.

Smart News:-