कोल्हापुरात याच्या आगमनाने नागरिक चिंताग्रस्त! सावधानतेची गरज!

कर्नाटक सीमेकडून वीस वर्षामागे चंदगड व सिंधुदुर्गातील हद्दीत हत्तीचे (elephant) वारंवार आगमन होत आहे .अनेकदा या हत्तींकडून प्रचंड मोठे नुकसान देखील केले जात आहे, सुरुवातीला काहींचा मृत्यू ही झाला आहे . अलिकडील काळात हत्ती व गवे या प्राण्यांच्या कडून होत असलेल्या नुकसानीला शेतकरी जाम वैतागले आहेत. आज शुक्रवारी तर या हत्तीचे गजबजलेल्या अडकुर, तसेच जवळपासच्या गणुचीवाडी, आमरोळी, केंचेवाडी परिसरात आगमन झाले . त्यामुळे एकच खळबळ उडाली असून हत्तीला पाहण्यासाठी व घाबरूनही एकच पळापळ झाली .
अडकूर परिसरातील गणुचीवाडी गावामध्ये श्री कोट यांच्या शेतात आज (शुक्रवार दि. २५ मार्च रोजी) सकाळी आठ वाजता हा एकच (elephant)हत्ती घटप्रभा नदीच्या दिशेने जाताना दिसला. ऊसाची नुकतीच लागवड केलेल्या या शेतात अगदी हाकेच्या अंतरावरील हत्ती जात असल्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. तसेच हा हत्ती अडकूर बंधाऱ्यालगत असणाऱ्या घटप्रभा नदिमध्ये अंघोळ करत असतानाची चित्रे व व्हीडीओ अनेक प्रवाशांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपून घेतली .या हत्तीने नंतर घटप्रभा नदी ओलांडून पलीकडे गेला. शेतात हत्तीच्या पायांचे ठसे दिसून आले. अचानक आलेल्या या हत्तीने सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांची भंबेरीच उडाली. तर अनेकांनी परिसरातील शेतकऱ्यांना सावध केले. सध्या हत्ती अमारोळी क्रशर मशिनच्या येथून केंचेवाडीच्या दिशेने निघून गेला तर थोड्या वेळाने पुन्हा अडकुरच्या दिशेने परतल्याची ताजी माहिती आहे. त्यामुळे लोकांचा वावर तसेच नवीन परिसरामध्ये आल्याने तो तिथेच फिरत असल्याचे दिसते.
हत्ती आल्याचे कळतच अडकुरसह परिसरात एकच गर्दी झाली होती. या घटनेने शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सर्वत्र ऊसाची लागवड केलेली असून या हत्तिकडून उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तरी वन विभागाने हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील नागरिकातून होत आहे. घटनास्थळी वन विभाग लक्ष ठेवून आहे.मात्र जो पर्यंत नदि परिसरातून हत्ती जाणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून राहावे लागणार आहे,तरी वनविभागाच्या वतीने सावधानता बाळगावी असे सांगितले जात आहे, वनविभागाकडून या हत्ती ला जंगलाकडे तत्काळ सोडता येईल असे प्रयत्न होणे आवश्यक आहे.
हेही वाचा :