कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी संस्था निवडणूक लांबणीवर

जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना (Cooperative Societies Election) पुन्हा ब्रेक लागला आहे. ग्रामपंचायत निवडणुका असल्याच्या पार्श्वभूमीवर अ व ब गटातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना २० डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे याबाबत चे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे विशेष कार्य अधिकारी श्रीकृष्ण वाडेकर यांनी काढले आहेत.निवडणुका पुढे गेल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे

ग्रामपंचायत निवडणूका असल्याने जिल्ह्यातील कुरुंदवाड (Cooperative Societies Election) येथील गणेश बँक, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी, पोलिस कर्मचारी सोसायटी, गडहिंग्लज अर्बन आदी विविध २० संस्थांच्या निवडणुका आता लांबणीवर पडल्या आहेत क व ड वर्गासह न्यायालयाचे आदेश असलेल्या संस्थांचा निवडणूक कार्यक्रम मात्र पुढे सुरू राहणार आहे.

ग्रामपंचायत व सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी सुरू असल्याने गावागावांत वातावरण तसेच कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. अ व ब वर्गातील संस्थांचे कार्यक्षेत्र हे तालुक्याबाहेरही असू शकते. त्यांची सदस्य संख्याही मोठी आहे ग्रामपंचायत निवडणुका याच दरम्यान संस्था निवडणूक झाल्यास हे सभासद मतदानापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे अ व ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: