कोल्हापूर : सख्या बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना!

शाहूवाडी येथील भाड्याने राहत असलेल्या घरात 19 वर्षीय भावाने (ता. शाहूवाडी) आपल्या 13 वर्षे वयाच्या सख्ख्या अल्पवयीन बहिणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून गरोदर केल्याची नात्याला (crime invistigation) काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. संशयितास मलकापूर-शाहूवाडीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. आर. पाटील यांनी पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.(crime invistigation)
संशयित आरोपी, फिर्यादी व पीडित मुलगी शाहूवाडी येथे भाड्याने राहत आहेत. भावाने मागील सहा महिन्यांपासून अल्पवयीन बहिणीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर केले.
मुलीच्या पोटात दुखू लागल्याने आईने तिला दोन दिवसांपूर्वी सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता ती गरोदर असल्याचे संबंधित वैद्यकीय अधिकार्याने सांगितले. त्यानंतर आईने फिर्याद दिल्यानंतर संशयित आरोपीविरुद्ध शाहूवाडी पोलिसांत पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद झाला. अधिक तपास पोलिस निरीक्षक विजय पाटील, फौजदार प्रसाद कोळपे करीत आहेत.
हेही वाचा :