जोतिबा दर्शनासाठी भाविकांची गर्दी

जोतिबा: जोतिबा डोंगरला (Jyotiba Temple) जोतिबा दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली. ५ जून ला सरता रविवार पालखी सोहळा होणार. उन्हाळी सुट्टी लग्नाचा हंगाम मुळे भाविकांची जोतिबा दर्शनासाठी अलोट गर्दी झाली. भाविका बरोबर पर्यटकांची संख्या वाढत आहे.
रविवारी जोतिबा डोंगर भाविकांच्या गर्दीन हाऊस फुल्ल झाला. लांबच लांब दर्शनाच्या रांगा लागल्या होत्या. मंदिरात सकाळी अभिषेक महापुजा धार्मिक विधी झाला. चांगभलं चा गजर करीत गुलाल खोबऱ्याची उधळण भाविकांनी केली. पार्किंग वर वाहनाची वर्दळ मोठी होती. जोतिबा चा मुख्य पायरी मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलला होता उत्तर दरवाज्या मध्ये लोखंडी दुभाजक लावल्यामुळे मंदिर प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार झाले.
दरवाज्यामध्ये होणाऱ्या गर्दीचा ताण कमी झाला. सकाळी ११ वाजता उंट, घोडे, वाजंत्री देवसेवकांच्या लवाजम्यासह धुपारती सोहळा निघाला. दुपारी बारा नंतर गर्दी जास्त झाली. दर्शन रांग व्यवस्थेसाठी देवस्थान कर्मचारी, कमाडो रक्षक, स्वंयसेवक, पुजारी उपस्थित होते. रात्री ८ वाजता रविवारी जोतिबा दर्शनासाठी भाविकांची जोतिबा मंदिरात(Jyotiba Temple) झालेली अलोट गर्दी. पालखी सोहळा झाला. दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची ने जोतिबाचे दर्शन घेतले. ५ जून ला सरता रविवार पालखी सोहळा होणार आहे. यानंतर चार महिने पालखी सोहळा बंद ठेवला जातो. दुसऱ्यातील खंडेनवमी ला पहिली पालखी निघते. सरता रविवार हा ७ जुन च्या आत होत असतो. सरता रविवार पालखी सोहळ्यास भाविक मोठ्या प्रमाणात येतात. स्थानिक पुजारी ही नवीन कपडे परिधान करून साखर पेठे वाटतात.
Smart News:-
आरके नगर ते शहापुर स्मशानभूमी पर्यंतचा रस्ता अखेर पूर्ण
मान्सून वेळेआधीच दाखल; राज्यात १० जूनपर्यंत येणार
आपल्या त्वचेची विशेष काळजी घेण्याची हीच ती खरी वेळ!
आरोग्य उत्तम राखण्यासाठी सकाळच्या नाष्ट्यात ‘या’ गोष्टीचा करा समावेश; होईल फायदा, जाणून घ्या
BCCI ने Guinness Book मध्ये नोंदवलं जाईल असा पराक्रम केला