मुश्रीफ यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा खरपूस समाचार! पहा video..

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार (current political news) संघात तीन लाख मतदार असल्याने तीन लाख कार्यकर्ते राज्यभरातून प्रचारासाठी येतील असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी खिल्ली उडवली आहे. तीन लाख कार्यकर्ते आणून कोल्हापूरात (Kolhapur) युद्ध करायचे आहे काय? असा सवाल मुश्रीफ यांनी केला.
दरम्यान, आता त्यांच्या या वक्तव्याचा भाजपाचे समरजीतसिंह घाटगे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. देशद्रोह्यांशी संबंधाचे आरोप असणाऱ्या मलिकांच्या समर्थनासाठी तुम्ही कोल्हापूरच्या ऐतिहासिक भूमीत फिरला तेव्हा कोल्हापूरचा स्वाभिमान आठवला नाही का?, असा सवाल घाटगे यांनी केला आहे.(current political news)
काय म्हणालेत समरजीतसिंह घाटगे
मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा दाऊदशी संबंध आहे. मलिकांनी हसीना पारकरला पैसे दिले त्या पैशांचा वापर करून दाऊदने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केले. असंख्य भारतीय मारली गेली आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ते आज तुरुंगात आहेत. ज्या नवाब मलिकांनी रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घोषणा देण्यास नकार दिला. अशा नवाब मलिकांच्या पाठिंब्यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी कागल येथे रॅली काढली. यावेळी कोल्हापूरकरांचा आणि कोल्हापूरच्या अस्मतेचा अपमान होत नाही का? असा सवालही त्यांनी केला आहे.
राज्यभरातून तीन लाख कार्यकर्ते कोल्हापूरात येतील या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांचा समाचार घेताना कोल्हापूरात युद्ध करायचे आहे असा सवाल मुश्रीफांनी केला. युद्ध करायचे असे तर कार्यकर्त्यांना युक्रेनला पाठवा असा सल्लाही त्यांनी दिला. कोल्हापूर उत्तरच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्याचं राजकारण चांगलंच तापलं असून आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरुच आहे.
हेही वाचा :