UAEच्या राष्ट्रपतींच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर, शाहू स्मृती शताब्दीनिमित्तचे आजचे कार्यक्रम रद्द

संयुक्त अरब अमीरातचे (uae) राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे काल, शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आज, शनिवारी (दि.१४) राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे शाहू स्मृती शताब्दीनिमित्त आयोजित कोल्हापुरातील आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त कोल्हापुरात गेल्या पंधरा दिवसापासून विविध कार्यक्रम सुरु आहेत. याकार्यक्रमातून शाहूंच्या विचाराचा जागर सुरु आहे. आज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत १२ राज्यातील लोककलावंतांचा होणारा कार्यक्रम, केशवराव भोसले नाट्यगृहात होणारे संगीत स्वयंवर नाटक व पापाची तिकटी येथील शाहिरी पोवाडा हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यातील १२ राज्यांतील लोककलावंतांचा कार्यक्रम उद्या, रविवारी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

uae

uae मध्ये ४० दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सरकारने ४० दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. याशिवाय, देशातील सर्व खासगी आणि सरकारी क्षेत्रात तीन दिवस सुट्टी जाहीर केली आहे.

यूएईचे दुसरे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे १६ वे शासक

शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांनी ३ नोव्हेंबर २००४ पासून देशाचे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे शासक म्हणून पदभार स्वीकारला होता. १९४८ मध्ये जन्मलेले शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान हे यूएईचे दुसरे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे १६ वे शासक होते. शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांनी आपल्या कार्यकाळात यूएई आणि अबू धाबीच्या प्रशासनाची पुनर्रचना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि अनेक सुधारणा अंमलात आणल्या. त्यांच्या कार्यकाळातच यूएईचा एवढा विकास झाला की, इतर देशांतील लोकही याठिकाणी मोठ्या संख्येने पोहोचले.

हेही वाचा :


शाहरुखची मुलगी सुहानाच्या चित्रपटाचा टीझर लॉन्च! (Video)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *