कोल्हापूरमध्ये गर्भवती महिलेचा झाला मनाला चटका लावणारा अंत..!

आई होणं, मातृत्व स्वीकारणं महिलांसाठी कायम खास असतं. कोणतीही बाळंतीण स्त्री जन्माला येणाऱ्या लेकराची सुरक्षितेला प्राधान्य देत असते. जमेल तितक्या वेदना सहन करून स्त्रिया आईचं रुप घेत असतात. हीच इच्छा मनात बाळगून खानापूरच्या सरकारी दवाखान्यात महिला प्रसूतीसाठी (cesarean) दाखल झाली होती.
मात्र प्रसूत होईपर्यंत या महिलेला प्राणाला मुकावं लागलं. मात्र, डॉक्टरांनी हार न मानता तातडीने सिझेरियन केली. यामुळे महिलेच्या गर्भातील जुळ्या लेकींना जीवदान मिळालं. प्राणाला मुकल्यानंतरही तिच्या गर्भातील लेकी सुखरुप बाहेर आल्या.
खानापूर तालुक्यातील गंगवाळीच्या अश्विनी अरुण शिंदे २८ वर्षांच्या होत्या. तिसऱ्या बाळंतपणासाठी त्या गावी आल्या होत्या. गुरुवारी (10मार्च) दुपारी त्यांना खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी रुग्णालय गाठलं. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनी तत्काळ ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल केलं.
नॉर्मल प्रसुती अशक्य वाटल्याने डॉक्टरांनी सिझेरियन (cesarean) करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यादरम्यान अश्वीनीची प्रकृती खालावली. तिचा रक्तदाब कमी झाला. आणि सिझेरियन करण्याआधीच हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये अश्विनीचा मृत्यू झाला. यानंतर पतीने मुलींना वाचवण्याचा निर्णय घेतला. आणि सिझेरियन पार पडली. यानंतर जुळ्या लेकी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. जन्म झाल्यानंतर तत्काळ लेकींना इनक्यूबेटरमध्ये ठेवण्यासाठी बेळगावला पाठवण्यात आलं. दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर आहे. त्यांची आवश्यक काळजी घेण्यासाठी डॉक्टरांनी विशेष व्यवस्था केली आहे.
या प्रसंगाने मातेच्या मृत्युनंतरही मातेची कूस बाळाचे समर्थपणे रक्षण करू शकते. हे प्रकर्षाने दिसून आले. अश्विनीच्या मृत्युनंतर आईचा चेहराही पाहू न शकलेल्या गोंडस मुलींकडे पाहून दवाखान्याचा स्टाफ आणि जमलेल्या प्रत्येकाला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा :