इलेक्ट्रिक दुचाकीने इचलकरंजीत घेतला पेट!

येथील गणेशनगर भागात रस्त्यावरच इलेक्ट्रिक दुचाकीने (electric bike) अचानक पेट घेतला. चालक दुचाकीवरून गणेशनगर गल्ली नंबर तीन मधून निघाले होते. अचानक गाडीतून धूर येऊ लागल्यामुळे चालकाने दुचाकी रस्त्याच्या बाजूस उभी केली. बघता बघता दुचाकी पेटली.

परिसरातील नागरिकांनी गाडीजवळ धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा आणखी भडका उडाला.

तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत दुचाकी (electric bike) जळून खाक झाली होती. यावेळी काही वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

हेही वाचा:


दरमहा 4 हजार गुंतवा अन् मिळवा 30 लाखांपेक्षा जास्त परतावा…

Leave a Reply

Your email address will not be published.