हत्तीचा वीजेशी खेळ:आजरा तालुक्यातील पेरणोली प्रकार

आजरा (प्रतिनिधी) : पेरणोली ता. आजरा येथे हत्तीने(elephant) सलग दोन दिवस तळ ठोकून उस, भात, भूईमूग, नाचणी या पिकांचे नूकसान करत, कृषी पंपाची विद्युत पेटी फोडून विजेचे खांब ,तारेची मोडतोड केल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. सुदैवाने विद्युत पुरवठा बंद असल्याने कोणतीही जीवितहानी टळली.

पेरणोली येथे बुधवारी रात्री व गुरुवारी रात्री ११ नंतर सलग दोन दिवस येथील ज्ञानोबा जोशिलकर ,तातोबा जोशिलकर,निलम जोशिलकर यांच्या बोरीचा सरवा नावाच्या शेतातील दोन एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील भाताचे व उसाचे नूकसान केले आहे. तसेच गजानन नलगे यांचा उस,भात व मारूती वंजारे, चंद्रकांत वंजारे यांंचा भूईमूग, नाचणीचे नूकसान केले आहे.

गेले सहा महिने या भागाकडे हत्ती फिरकला नव्हता. पुन्हा हत्ती(elephant) व गव्यानी थैमान घालायला सुरुवात केली आहे.बहरलेल्या पिकांचे नूकसान होत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.

दरम्यान वनक्षेत्रपाल स्मिता डाके, वनपाल बाळेश नाव्ही,वनरक्षक प्रियांका पाटील, वनकर्मचारी मारूती शिंदे,सुरेश पताडे,अनिल कांबळे यांनी पंचनामा केला.हत्तीच्या बंदोबस्तासह शासनाकडून वाढीव नूकसानभरपाईचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा :