‘त्या’ १२ जणांच्या यादीतील माझं नाव वगळा; राजू शेट्टी

नुकतेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता राजू शेट्टी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली आहे.महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त बारा विधानपरिषद सदस्य नेमण्यासाठी मंत्रिमंडळाचा ठराव करून बारा व्यक्तींच्या (list) नावाची शिफारस राज्यपालांच्याकडे करण्यात आलेली आहे. त्या यादीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेटटी यांचे सामाजिक, कृषी व सहकार या विभागातील माहितीगार व अनुभवी व्यक्ती म्हणून शिफारस होती.

आज राजू शेटटी यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर आमचा आणि महाविकास आघाडीचा संबंध संपला असल्याने या यादीतून माझे नाव वगळण्यात यावे असे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचेकडे दिले. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, बारा आमदारांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये झालेले आरोप, प्रत्यारोप, कुटील व गलिच्छ राजकारण यामुळे महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक वातावरण अतिशय गढूळ झालेले आहे. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणजे चेष्ठा व टिंगल टवाळीचा विषय झालेला आहे असं त्यांनी म्हटलं.(list)

Exclude my name from the list of 'those' 12 people; Raju Shetty

तसेच मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, त्या सहकार आणि कृषी क्षेत्रातील अनेक धोरणाबद्दल माझ्यासहीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आक्षेप आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून सरकार स्थापनेपासून घटक पक्षांना विश्वासात न घेता राज्यकर्त्यांच्या फायद्यासाठी जाणीवपुर्वक शेती , सहकार या क्षेत्रात चुकीचे घोरणे राबविले जात आहेत. यामुळे या सरकारच्या शिफारशीवरून विधानपरिषद सदस्यत्व स्विकारणे मला नैतिकदृष्ट्या अयोग्य वाटते. म्हणून, ज्यावेळी आपला व राज्य सरकारचा समझोता होऊन बारा सदस्यांना नियुक्त करण्याचा निर्णय होईल त्यावेळेस त्या यादीतून माझे नाव वगळण्यात यावे असे लेखी पत्राद्वारे कळविले आहे. यावेळी भेटीवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, रविकांत तुपकर , बापूसाहेब कारंडे , सुरेंद्र पंढरपूरे ,दिनेश ललवानी , सचिन कड , आकाश दौंडकर यांचेसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :


हा प्रसिद्ध साउथ सुपरस्टार करणार बॉलिवूडमध्ये एंट्री?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *