चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना १०.७८ लाख भरण्याचे आदेश

High Court judge

कोल्हापूर: ता.२३(प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना सहा आठवड्याच्या आत १० लाख ७८ हजार ५९३ रुपये भरण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी (High Court judge) दिले आहेत. हा आदेश माजी संचालकांना लागू आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या इतिहासात प्रथमच सर्व संचालकांवर अशी कारवाई झाली आहे(High Court judge).

हा आदेश माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, विजय पाटकर, विजय कोंडके, माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, माजी खजिनदार सतीश बिडकर, माजी कार्यवाह सुभाष भुरके, माजी सहखजिनदार अनिल निकम, माजी सहकार्यवाह संजीव नाईक, संचालक सतीश रणदिवे, प्रिया बेर्डे, अलका कुबल, इम्तियाज बारगिर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती व प्रमुख व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर यांना हा आदेश लागू आहे.

पुणे येथे झालेल्या मानाचा मुजरा या कार्यक्रमासाठी माजी संचालकांनी रु. ५,२०,००० रुपये खर्च केले होते. यावर सभासदांनी वार्षिक सभेत आक्षेप घेतला होता. त्यानंतर कोल्हापूर येथील काही सभासदांनी धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर प्रथम चॅरिटी कमिशनर कोल्हापूर यांनी ही रक्कम भरण्याचा आदेश दिला होता; परंतु टंकलेखनाची चूक झाल्याने तत्कालीन संचालकांनी रक्कम भरलीच नाही.

अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यानंतर पुन्हा एकदा कोल्हापूर चॅरिटी कमिशनर यांनी टंकलेखनाची चूक सुधारून नव्याने आदेश काढून उपरोक्त रक्कम भरण्याचा आदेश दिला; परंतु यावेळी याच संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर त्यांना प्रथम ही रक्कम न्यायालयात जमा करण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला आहे.

 

Smart News:-