बारामती वीज भारनियमनाचा पॅटर्न राज्यभर राबवा; सुरेश हळवणकर

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार हे कृत्रिम टंचाई निर्माण करत असून बारामतीच्या (Baramati) धरर्तीवर सर्वत्र दिवसा वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने द्यावा तसेच येत्या आठ दिवसांमध्ये वीज पुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी भाजपचे (BJP) माजी आमदार सुरेश हळवणकर (Former MLA Suresh Halwankar) यांनी आज पत्रकार परिषदेत केली.(press conference)

बारामतीमध्ये रात्रीच्यावेळी भारनियमन केलं जातं. मात्र कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह राज्यभरात दिवसा विज भारनियमन केलं जातं. महावितरण कंपनीने हे थांबवून घोषित भारनियमन सुरु करावं अशी मागणी त्यांनी केली. पुढे ते म्हणाले, पुरेश्या प्रमाणात कोळश्याची उपलब्धता आहे. विज पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहे. अशात विजेचे भारनियमन लादन हे चुकीचे आसून महावितरणाने याबाबत खुलासा करावा असे आव्हानही हळवणकरांनी केले.(press conference)

बारामतीत रात्री ११ ते ५ या वेळेत भारनियमन केले जाते. मात्र महाराष्ट्रात इतर ठिकाणी सकाळी ११ ते ५ वेळेत भारनियमन केले जाते. राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. केंद्र सरकारने कोळसा मोठ्या प्रमाणात उपलब्ध केला आहे. त्यामुळे राज्यात विजटंचाई होत नाही असा दावा केंद्राने तसेच महावितरणाने असताना भारनियमन लादन जात असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा :


एमएस धोनीच्या ex-girlfriend चा हॉट लूक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *