कोल्हापूर : लग्नाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला!

राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी  येथील हॉटेल अमरनजीक कंटेनर-कार  यांच्यात शुक्रवारी (ता. २७) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यात लग्नकार्यासाठी  (for wedding) जाणाऱ्या कारमधील चार जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये नवरीच्या भावासह, चुलते-चुलती व आजीचा समावेश आहे. महेश देवगोंडा पाटील (वय २३), आदगोंडा बाबू पाटील (वय ५५), छाया आदगोंडा पाटील (वय ५५, तिघेही बोरगाववाडी, ता. निपाणी) व चंपाताई मगदूम (वय ८०, रा. राशिवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. मंगल कार्यासाठी जाणाऱ्या चौघांचा जागीच मृत्यू झाल्याने शहर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबद्दल घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बोरगाववाडी  येथील देवगोंडा पाटील यांच्या मुलीचा (for wedding) विवाह शुक्रवारी (ता. २७) तवंदी येथील समुदाय भवनात होता. त्यासाठी आदगोंडा व अन्य तिघेजण कार (केए २३ एन ४४२८) मधून निपाणीहून तंवदीकडे भवनाच्या दिशेने जात होते. हाॅटेल अमरसमोर गेल्यावर काही वेळात भवनाच्या दिशेने वळण घेणार इतक्यातच घाटातून निपाणीच्या दिशेने भरधाव वेगात येणारया कंटेनर (एचएल ०१ के ११२४) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरची कारला जोरदार धडक बसली. त्यात कारमधील आदगोंडा यांच्यासह चंपाताई, छाया आणि महेश यांचा जागीच मृत्यू झाला.

कंटेनरची धडक इतकी जोरात होती, की कार सुमारे दहा फूट उंचावर उडून सेवारस्त्यासह महामार्गाच्या बाजूला दूरवर जाऊन आदळली. त्यात कारचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच नजिकच्या भवनामधील पाहुणे, मित्रमंडळींसह अमर हाॅटेलमधील कर्मचारी, महामार्गावरुन जाणारया-येणारयांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी लोकांनी रुग्णवाहिकेसह पोलिस व हायवे पेट्रोलिंकच्या पथकाला पाचारण केले. यावेळी कारमधील मृतदेह काढण्यासाठी उपस्थितांनी निकराने प्रय़त्न केले. कारचा चक्काचूर झाल्याने मृतदेह बाहेर काढताना अडथळे येत होते. तरीही घटनास्थळी उपस्थितांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू ठेवले. हायवे पेट्रोलिंकसह पोलिस कर्मचारी आल्यावर त्यांनीही मदतकार्य केले. जवळपास तासाभराने सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

अपघातानंतर कंटेनर चालक व्दारकासिंग (रा. बिहार) हा फरार झाल्याची चर्चा होती. मात्र काही वेळाने व्दारकासिंग महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. त्याच्याही डोकीला दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी, शहर पोलिस उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्लहोसूर, अनिलकुमार कुंभार यांच्यासह पोलिसांनी (Nipani Police) पंचनामा केला. निपाणीतील महात्मा गांधी रूग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. निपाणीसह परिसरात दिवसभर या अपघाताचीच चर्चा दिवसभर सुरू होती.

एकुलता मुलगा हिरावला
देवगोंडा पाटील यांना महेश एकुलता मुलगा होता. तो पुण्यात इंजिनिअर म्हणून सेवेत होता. बहिणीच्या लग्नानिमित्त तो घरी आला होता. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला. एकुलता मुलगा हिरावल्याने बोरगाववाडीसह शहर परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. चुलता-चुलतीही या अपघातात गेल्याचे समजताच घटनास्थळी हळहळ व्यक्त करण्यात येत होती. राशिवडेहून लग्नकार्यासाठी आलेली आजीही मृत पावल्याने या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला.

हेही वाचा :


छत्रपती संभाजीराजेंचा ‘यांनी’ ठरवून गेम केला;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *