कोल्हापूरमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट!

राजेंद्रनगरात आज सकाळी स्वयंपाकाच्या सिलिंडरचा (cylinder) अचानक स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या आगीत घराचे मोठे नुकसान झाले. या आगीची झळ शेजारील दोन घरांनाही बसली. स्फोट झालेल्या घरातील प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. यामध्ये रोकड, दागिन्यांसह घरांचे मिळून अंदाजे २६ लाखांचे नुकसान झाल्याची भिती व्यक्त होत आहे. याबाबतची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की राजेंद्रनगरातील मस्जिद गल्लीत हसीना सय्यद यांचे घर आहे. त्या कुटुंबासोबत येथे राहतात. त्यांच्या घरात दोन ते तीन दिवसापूर्वी मंगलकार्य झाले. त्यासाठी नातेवाईकही त्यांच्या घरात आले होते. त्यांची सून आज सकाळी दहा ते सव्वा दहाच्या सुमारास नाष्टा करण्यासाठी गॅस पेटवत होती. दरम्यान सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे घरातील सर्वमंडळी घाबरून घराबाहेर पडली. (cylinder) स्फोटामुळे घराला मोठी आग लागली.

यावेळी झालेल्या ओरड्याने परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी याची माहिती अग्निशामक दलाला व राजारामपुरी पोलिसांना दिली. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग अटोक्यात आणली. मात्र त्यापूर्वी घरातील टीव्ही, भांडी, फर्निचरसह सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. यामध्ये घरात मंगलकार्यालयासाठी आणलेली तीन लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिन्यांचेही नुकसान झाले. आगीची झळ शेजारी राहणाऱ्या गुरव कुटुंबाच्या दोन घरालाही लागली. या संपूर्ण आगीत सुमारे २६ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याबाबत प्राथमिक तपास पोलिस निरीक्षक इश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली अमंलदार संजय जाधव करीत आहेत.

अंगावरील कपडेच शिल्लक

स्फोटामुळे लागलेल्या आगीत घरातील सर्वच साहित्य जळून खाक झाले. यामध्ये मंगलकार्यासाठी खरेदी केलेल्या नव्या कपड्यांचाही समावेश होता.

महिलांच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा…

स्फोटात घराचं होत्याचं नव्हतं झाले. घरातील प्रापंचिक साहित्याचे झालेले नुकसान पाहून कुटुंबातील महिलांच्या डोळ्यातून अश्रुच्या धारा वाहत होत्या.

हेही वाचा :


देशावर येणार पुन्हा वीज संकट…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *