साडे तीन लाख रूपयांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Liquor transport

कोल्हापूरच्या भरारी पथकाची गवसेत कारवाई…

आजरा-आंबोली मार्गावरील गवसे येथे कोल्हापूरच्या भरारी पथकाने गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी(Liquor transport) विरोधात कारवाई करत पावणे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी डॅनीश कामील फर्नांडिस (वय २६, रा. इन्सुली पागावाडी) या संशयितास ताब्यात घेतले.

कोल्हापूर भरारी पथकाने शुक्रवारी आंबोली- आजरा मार्गावर गवसे येथे कारवाई केली. या कारवाईत विविध ब्रँडचे एकूण १८० मिलीच्या ३८४ बाटल्या व ७५० मिलीच्या ४२० बाटल्या अशी एकूण ३ लाख ५८ हजार .

३२० रुपयांची दारु जप्त करण्यात आली. तसेच दारु वाहतुकीसाठी(Liquor transport) वापरलेली सुमारे ५ लाख २० हजार रुपयांची स्विफ्ट कार (क्रं. एमएच-४८-ए-६५०६) असा एकूण ८ लाख ७८ हजार ३२० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. सदर कारवाई कोल्हापूर विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या आदेशान्वये निरीक्षक पी.आर.पाटील, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, जे.एस.पवार, कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, संतोष बिराजदार, दीपक कापसे यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे करीत आहेत.

Smart News:-

MPSC : एमपीएससीच्या गट क वर्गातील पूर्वपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी, 3 एप्रिलला होणार परीक्षा


स्ट्रेसफुल ते जॉयफुल; पोलीस अधीक्षकांचा ‘काचा बदाम’वर भन्नाट डान्स व्हायरल


रशिया-युक्रेन युद्धादरम्यान इलॉन मस्क यांचे मोठे वक्तव्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *