कडेकोट बंदोबस्तात गुणरत्न सदावर्तेंना कोल्हापुरातील कोर्टात केले हजर

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात आज गुरुवारी हजर करण्यात आले. शाहूपुरी पोलिसांनी सदावर्ते यांचा बुधवारी (दि.20) सायंकाळी आर्थर रोड जेलमधून ताबा (possession) घेतला होता. काल मध्यरात्री हे पथक कोल्हापुरात दाखल झाले.

अ‍ॅड. सदावर्ते यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात (possession) हजर करण्यात आले. पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त न्यायालय आवारात तैनात करण्यात आला आहे. न्यायालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी सकल मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी अ‍ॅड. सदावर्ते यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली होती. यानंतर पोलिसांचे पथक मुंबईला रवाना होत, सदावर्ते यांना ताब्यात घेतले. यानंतर अ‍ॅड. सदावर्ते यांच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :


आनंदाची बातमी, बँकेत न जाता असे मिळणार सहज कर्ज!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *