कोल्हापुरात शिवसेनेकडून पाकिस्तान ध्वजाची होळी; पीएफआयवर कायमची बंदी घाला- जिल्हाप्रमुख संजय पवार

कोल्हापूर,दि.२८(बी.टी.एन.प्रतिनिधी)राष्ट्रीय तपास यंत्रणे -च्या देशभरातील छापेमारीमुळे(political issues) पीएफआय संघटनेच्या अतिरेकी कारवायाचा पर्दाफाश झाला. देशासह राज्यात आणि जिल्ह्यांतही काहींची धरपकड करण्यात आली. पुण्यात पाकिस्तानच्या घोषणा देण्यात आल्याने, सर्वत्र संतापाची लाट उसळली असताना, आज जिल्हा शिवसेनेच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौकात पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची जाहीर होळी करून,पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणां देत,शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.

राष्ट्रीय तपास यंत्रणांनी नुकत्याच केलेल्या छापेमारीत(political issues) येथील एकाला अटक करण्यात आली. देश विरोधी कारवाई करण्यासाठी पाकिस्तान अशा संघटना पाठीशी घालत असल्याच्या निषेधार्थ जिल्हा शिवसेनेच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौकात पाकिस्तानचा प्रतिकात्मक राष्ट्रध्वज जाळण्यात आला. यावेळी देशात घातपाताचा प्रयत्न करत असलेल्या पीएफआय संघटनेवर कायमची बंदी घाला अशी मागणी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी यावेळी केली.

यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे,रविकिरण इंगवले,सुनील मोदी,मंजित माने,शुभांगी पोवार, स्मिता सावंत,रवि चौगुले,दीपक गौड,विनोद खोत, सुशील भांदिगिरे,सुरेश पोवार,किरण पडवळ, धनाजी दळवी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा :