हुपरी ‘रजत’च्या मुलींच्या संघाची जिल्हा कबड्डी स्पर्धेसाठी निवड

हुपरी : क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा परीषद, कोल्हापूर यांच्या विद्यमाने किणी हायस्कूल किणीच्या मैदानावर घेण्यात आलेल्या शासकीय शालेय हातकणंगले तालुकास्तरीय (kabaddi) कबड्डी स्पर्धेमध्ये हुपरी येथील शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक असलेले रजत एज्युकेशन सोसायटीच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांकाचा मान पटकाविला त्यांची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये निवड झाली आहे.

मुलींच्या कब्बडी (kabaddi) संघाची कर्णधार म्हणून सानिका कदम हिने सूत्रे सांभाळली. तालुक्यातील २२ शाळांच्या संघांनी किणी हायस्कूल येथे आयोजित कब्बडी स्पर्धेत सहभाग घेतला होता. मान्यवरांच्या हस्ते व शिक्षकांच्या उपस्थितीत या संघाला सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले. खेळाडूंना क्रीडा शिक्षक रघुनाथ पाटील, मधुकर घराळ, शाळेचे चेअरमन, संचालक, मुख्याध्यापिका, संचालिका, शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा: