deforestation | कोल्हापूरमध्ये दहा ट्रक लाकूड जप्त..!

deforestation

शाहूवाडी तालुक्यातील उदगिरी इनामदारवाडी येथे बेकायदेशीर वृक्षतोड (deforestation) झाल्याची घटना घडली. यात जवळपास दहा ट्रक बेकायदेशीर लाकूड वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगतच ही घटना घडली. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या उदगिरी- इनामदारवाडी नजीक मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड सुरू असल्याची माहिती मिळाली.

हा भाग ‘इको सेनसिटिव्ह झोन’ व ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’लगत आहे. त्यानुसार प्रादेशिक वन विभागातील क्षेत्र आहे. श्री. भाटे यांनी मुख्य वनसंरक्षक (कोल्हापूर) एम. रामनुज, उपवनसंरक्षक आर. आर. काळे तथा वनक्षेत्रपाल अमित भोसले यांना ही माहिती दिली. त्यानुसार वनक्षेत्रपाल भोसले, वनपाल व इतर वनरक्षकांचे

deforestation

 

पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा प्रत्यक्ष वृक्षतोड (deforestation) झालेल्या ठिकाणी जवळपास १० ट्रक वृक्षतोड झाली असल्याचे दिसले. आज दुसऱ्या दिवशीही पंचनाम्याचे काम सुरू होते. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वनक्षेत्रपाल भोसले, वनरक्षक अक्षय चौगले, विठ्ठल खराडे, आबासाहेब परीट, विशाल पाटील, वनपाल गारदी आदीनी या कारवाईत सहभाग घेतला.

हेही वाचा :


या अभिनेत्रींच्या सोबत ‘ही’ तिसरी सुंदरी आहे तरी कोण?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *