धबधब्याच्या पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला, एकाच बुडून मृत्यू

कुटुंबासमवेत वर्षा पर्यटनासाठी माण पैकी ठाणेवाडी ता. शाहूवाडी येथील पालेश्वर धरणावरील धबधब्यावर आलेल्या प्रकाश रामचंद्र मोहिते (वय ५८ मुळ रा.कराड जि.सातारा सध्या रा.शिवाजी पार्क कोल्हापूर) हे धबधब्याच्या पाण्यात पोहत असताना पाण्यात बुडून त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२.३० वा. घडली. याची नोंद (information police) शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.

पोलिसातून मिळालेली (information police) माहिती अशी की, मयत प्रकाश मोहिते हे आयकर विभागात कार्यरत आहेत. आज सकाळी त्यांचे मेहुणे उदयसिंह वसंतराव जाधव खासगी सिक्युरिटी (रा.मांगूर ता. चिकोडी जि. बेळगाव सध्या राजारामपूरी कोल्हापूर) हे वर्षा सहलीसाठीक कुटुंबसमवेत माण पैकी ठाणेवाडी येथील पालेश्वर धबधब्यावर आले होते. दरम्यान प्रकाश मोहिते हे पालेश्वर धरणावरील धबधब्याच्या पाण्यात पोहत असताना बुडाले.

कुटूंबियांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले तेव्हा ते बेशुद्ध आवस्थेत होते. त्यांना उपचारासाठी मलकापूर ग्रामीण रूग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे संबंधीत वैद्यकीय अधिकाऱ्यांने घोषित केले. रुग्णालयात शैवविच्छेदन करून पुढील विधीसाठी त्यांचा मृतदेह सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलिस नाईक एस बी स्वामी हे करिता आहेत.

हेही वाचा :


सांगली : होड्यांच्या स्पर्धेवेळी बोट उलटली

Leave a Reply

Your email address will not be published.