आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सजग ठेवा

disaster management system

मंत्री सतेज पाटील यांचे निर्देश

कोल्हापूर: शहरासह जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवू नये, यासाठी तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करा, अशा सूचना करुन मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा(disaster management system) सज्ज व सजग ठेवा, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

कोल्हापूर जिल्ह्याची मान्सून पूर्व आढावा | बैठक पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. पी. कुंभार यांच्यासह महसूल, महानगरपालिका, जिल्हा परिषद, कृषी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभागासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

Maharashtra: Minister of State for Home Satej Patil tests positive for COVID-19

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, मागील वेळच्या पूर परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी आपापली भूमिका चांगल्याप्रकारे पार पाडली आहे. पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागू नये, यासाठी सर्व उपाययोजना करा. पण आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मदत व बचाव कार्यात कोणतीही त्रुटी राहता कामा नये, याची दक्षता घ्यावी. पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत कार्याचे योग्य नियोजन करा. पूरप्रवण क्षेत्रात बोटी तैनात ठेवा. घाटमाथ्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी

नैसर्गिक चर काढा.

पुराच्या पाण्यामध्ये ट्रान्सफॉर्मर बुडाल्यामुळे ट्रान्सफॉर्मर आणि शेतीपंपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यावर उपाय म्हणून पूरपरिस्थितीत • ट्रान्सफॉर्मर प्लास्टिकच्या आवरणाने सुरक्षित पद्धतीने झाकून घेता येतील का याचा विचार करा. याकामी स्टार्ट ‘अप’च्या तरुणांची मदत घ्या, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवू नये, यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीचा(disaster management system) आढावा घेऊन तालुकानिहाय नियोजन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत पब्लिक ड्रेस सिस्टीमचा प्रभावीपणे वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Smart News:-

सूत दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा


सांगली: गाडीची काच फोडून ३७ तोळे सोने लंपास


सलग 36 व्या दिवशी इंधनाचे दर स्थिर, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव


Google ची कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर बंदी; तुम्हाला अडचण येईल? जाणून घ्या


प्रकाश आंबेडकरांनी आरपीआयचं अध्यक्षपद स्वीकारावं, मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार : रामदास आठवले


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *